जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते 'गुणवंत कामगारांना' विशेष कार्यकारी अधिकारी पदाचे वाटप

राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे कार्य उल्लेखनीय व कौतुकास्पद : जिल्हाधिकारी संतोष पाटील

Allocation of positions to meritorious workers, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले असून, शासन निर्णय २०२५ मधील तरतुदींनुसार सातारा जिल्ह्यातील पात्र गुणवंत कामगारांची 'विशेष कार्यकारी अधिकारी' (SEO) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते व सातारा तहसीलदार वैभव पिलारे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त अधिकाऱ्यांना नियुक्ती प्रमाणपत्र, ओळखपत्र व शिक्के प्रदान करण्यात आले.

यावेळी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, "राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे. नवनियुक्त विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी आता समाजाभिमुख कार्य करत राष्ट्रीय हित जोपासण्याचे काम करावे."

​राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष अशोकराव जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष गजानन घाडगे व विभागीय सदस्य शंकरराव मांढरे यांनी केलेल्या लेखी पत्रव्यवहार आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही नियुक्ती प्रक्रिया यशस्वी झाली. या अंतर्गत संजय गिरी, चंद्रकांत लोहार, प्रजय राऊत, संजय पवार, विठ्ठल तांबे, महेंद्र धनवे व आनंदा पाटील या गुणवंत कामगारांना विशेष कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली.

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अशोकराव जाधव यांच्या वतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील व तहसीलदार वैभव पिलारे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर नूतन नियुक्त अधिकारी तसेच ज्येष्ठ गुणवंत कामगार दिलीपराव चरेगावकर व गोपाळराव खजुरे यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच, प्रतिष्ठानचे संस्थापक दिलीपराव चरेगावकर यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष अशोकराव जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दिलीपराव चरेगावकर यांनी नवनियुक्त अधिकाऱ्यांना त्यांच्या नवीन पदाच्या जबाबदाऱ्या व कार्यप्रणाली सविस्तरपणे समजावून सांगितली.

या सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक नितीन मतकर व दीपक गुरव उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी आणि साताऱ्यामधील गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे बहुमोल सहकार्य लाभले. नवनियुक्त सर्व गुणवंत कामगारांवर सध्या संपूर्ण राज्यातून अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे. चहापानानंतर या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !