लाचलुचपतचा कन्नडमध्ये मोठा धडाका - ४० हजारांची लाच घेताना मकरनपूरचा ग्रामसेवक रंगेहात अटक

कामाचे बिल काढण्यासाठी मागितली होती लाच
Anti corruption bureau trapped gramsevak, 40 thousand rupees, red hand, kannad, Chhatrapati Sambhaji Nagar, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, कन्नड (प्रतिनिधी मनोज चव्हाण)
कन्नड तालुक्यातील मकरनपूर येथील ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) विजय पिराजी जोंधळे याला ४० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी (दि. ३ जून) मकरनपूर ग्रामपंचायत कार्यालयात रंगेहात अटक केली. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. या धडक कारवाईमुळे कन्नड तालुक्यासह संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४३ वर्षीय मूळ तक्रारदार यांनी रेल कनकावती नगर येथे 'दलित वस्ती सुधार योजने'अंतर्गत पेवर ब्लॉक बसवण्याचे काम पूर्ण केले होते. या कामाचे एकूण ८ लाख २० हजार रुपयांचे बिल मंजूर झाले होते. या मंजूर बिलाचे धनादेश (चेक) काढून देण्यासाठी मकरनपूरचा ग्रामसेवक आरोपी विजय पिराजी जोंधळे (वय ४८ वर्षे, रा. साईबाबा नगर, कन्नड) याने तक्रारदाराकडे ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तसेच ही रक्कम घेऊन ३ जून रोजी भेटण्यास सांगितले होते.
तक्रारदार यांची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने, त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कार्यालयात जाऊन थेट तक्रार नोंदवली.

तक्रारदाराच्या अर्जावरून ला.प्र.वि.च्या पथकाने ३ जून रोजी शासकीय पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. यावेळी आरोपी ग्रामसेवक विजय जोंधळे याने पंचांसमक्ष बिलाचे चेक देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. लाच मागणी सिद्ध होताच एसीबीच्या पथकाने मकरनपूर ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचला.
दुपारच्या सुमारास तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने झडप घालून आरोपी ग्रामसेवक विजय जोंधळे याला रंगेहात ताब्यात घेतले.

कारवाईदरम्यान आरोपीची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून लाचेची ४० हजार रुपयांची रक्कम आणि वन प्लस (OnePlus) कंपनीचा एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण सध्या सुरू आहे. तसेच, आरोपी जोंधळे याच्या साईबाबा नगर, कन्नड येथील निवासस्थानाची (घरझडती) तपासणी करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. या घरझडतीत काय निष्पन्न होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सदर धडक कारवाई ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक श्री. शशिकांत सिंगारे आणि पोलीस उपअधीक्षक श्री. बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सापळा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण, तपास अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक भास्कर नवले, सापळा पथक - पोलीस हवालदार रवींद्र काळे, विलास चव्हाण, राम गोरे आणि चांगदेव बागुल. यांनी केली असून वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे.

नागरिकांना आवाहन!
कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने, अथवा त्यांच्या वतीने कोणत्याही खाजगी व्यक्तीने शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.
टोल फ्री क्रमांक: १०६४
व्हॉट्सॲप क्रमांक: ७७२०८९१०६४
पोलीस अधीक्षक कार्यालय: ९०११०९२७७७

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !