कन्नड शहराजवळील उड्डाणपुलावर थरार - बायपासवर दोन कारची समोरासमोर धडक

भीषण अपघातात हरियाणातील एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी - घाटी रुग्णालयात उपचार सुरू

Three person enjoyed in road accident, kannad, Chhatrapati Sambhaji Nagar, shivshahi news, 
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड (प्रतिनिधी मनोज चव्हाण)
कन्नड शहराजवळील बायपास उड्डाणपुलावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली. दोन वाहनांच्या समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत एकाच कुटुंबातील तिघेजण गंभीर जखमी झाले असून, यात लहान मुलांचाही समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हरियाणा येथील एक कुटुंब बीड येथून आपल्या घराकडे (रेवाडी, हरियाणा) आय-ट्वेंटी कारने (HR 26 CA 7369) जात होते. कन्नड शहराजवळील बायपास उड्डाणपुलाजवळ त्यांची कार आली असता, समोरून येणाऱ्या टाटा सुमोने (MH 20 BY 8357) कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

हरियाणातील प्रवासी जखमी
या अपघातात आय-ट्वेंटीमधील तिन्ही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१. कार्तिक जितेंद्र कुमार (वय १६ वर्ष)
२. सौम्य जितेंद्र कुमार (वय १० वर्ष)
३. बीना कुमारी जितेंद्र कुमार (वय ३६ वर्ष)
(सर्व राहणार: रेवाडी, हरियाणा)

गंभीर जखमींवर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार
अपघात होताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, जखमींच्या डोक्याला आणि पायाला गंभीर इजा झाल्याने आणि दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने, प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात (घाटी) हलवण्यात आले आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल संताप
कन्नड बायपास परिसरात अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. या भागात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. प्रशासनाने या ठिकाणी गतिरोधक किंवा आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. टाटा सुमोमधील प्रवाशांबाबत अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !