अल्ताफ शेख यांच्या आगामी चित्रपटात आशिकी फेम राहुल रॉय झळकणार

आगामी हिंदी चित्रपटात ही जोडी सोबत काम करणार

Son of Solapur in the movie, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र  गेल्या काही वर्षांपासून शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पुणेला आपली कर्मभूमी बनविलेले हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीतील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध चित्रपट लेखक, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार आणि अभिनेते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले अल्ताफ दादासाहेब शेख यांनी आपल्या आगामी चित्रपटासाठी प्रचंड गाजलेल्या आशिकी या चित्रपटाचे मुख्य नायक असलेले अभिनेते राहुल रॉय यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत आगामी चित्रपट करण्याबद्दल बोलणे केले. यावर राहुल रॉय यांनी होकार दिला.

राहुल रॉय यांनी अल्ताफ शेख यांना अत्यंत आपुलकीने भेट देऊन बऱ्याच विषयांवर चर्चाही केली. या भेटीदरम्यान त्यांचा शांत आणि सरळ स्वभाव वाखाण्याजोगा होता. गप्पांच्या ओघात रॉय यांनी चित्रपट सृष्टीतील अनेक बारीक दुवे ही सांगितले. शिवाय अल्ताफ शेख यांनी आतापर्यंत हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीत अनेक चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक, गीतकार, संगीतकार, अभिनेते म्हणून केलेले कार्य चांगले असल्याचे म्हटले. आगामी हिंदी चित्रपटात ही जोडी सोबत काम करणार आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !