जागतिक महिला दिनानिमित्त वैजापूर येथे स्त्री शक्तीचा जागर

कर्तुत्ववान महिलांचा मान्यवरांंच्या हस्ते सन्मानपत्र देवून  गौरव 

The glory of womenThe glory of women, vaijapur, cht.sambhajinagar, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर (प्रतिनिधी अनिल सुर्यवंशी)

जागतीक महिला दिनाचे औचीत्य साधून उप जिल्हा रुग्णालय, वैजापूर छत्रपती संभाजीनगरच्या वतीने वैजापूर तालुक्यातील उत्कृष्ट कार्य करणा-या कर्तुत्ववान महिलांचा तसेच नैपुण्य प्राप्त केलेल्या मुलींचा सन्मान सोहळा 14 मार्च 2026 रोजी शिवराई रोड, वैजापूर येथील संताजी जगनाडे महाराज मंगल कार्यालयात  आयोजित करण्यात आला.

मा.वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एस.के.मुंढे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या कार्यक्रमात  बोलतांना म्हणाले  आरोग्य सेवेतील प्रत्येेक कर्मचारी हा महत्वाचा दुवा आहे.त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे विविध योजना  लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात. रुग्णांची योग्य शुॠषा करून त्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी मोलाचे सहकार्य त्यांच्या हातून घडत असते.अशा कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करणे म्हणजेच त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे असून यामुळे इतर महिलांनाही समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळते. 

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित या सन्मान सोहळ्यात तालुक्यातील विविध क्षेत्रातील कार्यरत महिलांंचा कार्याचा गौरव करण्यात आला.त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. माजी शिक्षणाधिकारी मा.धोंडिरामसिंग राजपूत यांनी सांगितले की महिलांनी उच्च शिक्षित व्हावे.आपल्या कर्तुत्वाचा ठसा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून जबाबदारीने पार पाडावी.

मुलांच्या तुलनेत मुलींचा घटत असलेला जन्म दर समाजातील प्रत्येकासाठी चिंतेचा विषय आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करा.स्त्रीभ्रूण हत्या करणे कायद्यांतर्गत गुन्हा आहे असे ही ते म्हणाले. वैद्यकीय अधिकारी डाॅ.सिद्धार्थ इंगोले,डाॅ.अभंग,डाॅ.दीपमाला परदेशी-एआरटी विभाग प्रमुख,  श्रीमती रुक्मिणी गवई मेट्रन यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतते साठी वैद्यकीय अधिकारी डाॅ.पालवे, डाॅ.फरहाना खान, डाॅ.रेश्मा, डाॅ.चौधरी, डाॅ.वेदपाठक, डाॅ.दुर्गा पाटील, डाॅ.गिते, डाॅ.वेदपाठक, डाॅ.दौडमणी, डाॅ.कंठेवाड, डाॅ.धोत्रे, डाॅ.सायंबर, डाॅ.चौधरी, डाॅ.चंदे, डाॅ.राजपूत, डाॅ.चव्हाण, डाॅ.साळवे, डाॅ.दुर्गा पाटील, डाॅ.पायाळ, बिडवे, नितिन मोरे, ज्ञानेश्वर भारुड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 श्रीमती शाहिन  हवालदार ,श्रीमती केदारे,श्रीमती गायगोले, श्रीमती विजया जंगम,श्रीमती पाडवी,श्रीमती भारती कदम ,कल्याण इष्टके,किसन चौधरी ,श्रीमती निर्मला बोरगे,श्रीमती अंजली गायकवाड, श्रीमती प्रीती भोंगे,श्रीमती विणकरे, रविकांत गडकरी, सौ.श्याम उचित,श्री.व सौ.सोनुने,हनिफ शेख, श्री व सौ पंकज कांबळे,संंय किर्तीकर,श्रीमती  नन्नवरे ,फिजा शेख ,मार्था वाघुले, इरफान पठाण,रवी विणकरे,लक्ष्मीकांत दुबे,मंगेश मापारी,नितोष सालुंके,शिंंदे सुरेश श्री.सौ  पाटील शशिकांत, मगर,विनायक,वैभव,विशाल, गिरी,सुरेश शिंदे,कल्पना जाधव,क्षीरसागर, अ‍ॅड.श्रीमती भालेराव,अ‍ॅड.नुसरत, श्रीमती वैशाली शेळके,नेेहा वाघमारे ,स्वाती संसारे,श्रीमती रोकडे,माया पाटील,श्रीमती मुळे मॅडम, श्रीमती उमा ज-हाड,अरविना लालगे,सोनाली माळी,सहकार्य केले.

तसेच कु.ऐश्वर्या त्रिभुवन, कु.वैष्णवी गिरी निवेदिता शिंत्रे,नुतन गिरी,कु.हिरण्या सुर्यवंशी,अंजली गायकवाड ,प्रिती भोंगे,कु.वैभवी गिरी,श्रीमती शितल बोधरे,श्रीमती गायगोले,  श्रीमती विणकरे,श्रीमती संगिता पठारे,श्रीमती कुमोदिनी त्रिभुवन ,प्रतिभा मुठे,खंडागळे, श्रीमती भागवत,श्रीमती अर्चना धात्रक,योगेश कंगाल,योगेश सोनवणे,विजय साळवे ब्रदर,आशा त्रिभुवन, अंभोरे ताई ,देवयानी, घोरपडे,श्रीमती मंदा पवार,कु.प्रज्ञा गवई, कु.शिवानी बागले,कु रितिका  बोधरे

श्री.किसन चौधरी आदींनी सांस्कृतिक कार्यक्रमात विविध नृत्याविष्कार सादर केला व सांघिक खेळात भाग घेतला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन करून श्री.किशोर वाघुले यांनी उपस्थितीतांची मने जिंकली.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !