मालदन सोसायटीवर भाजपच्या विजयाचा गुलाल - पालकमंत्री शंभूराजे देसाईंच्या पॅनेलला मोठा धक्का

१३ पैकी ११ जागांवर भाजपचे वर्चस्व; श्री बहिरदेव ग्रामविकास शेतकरी पॅनेलची सरशी

bjp wins socity election, maaldan, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे) 

पाटण तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मालदन विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजप नेते सत्यजितसिंह पाटणकर दादा यांच्या नेतृत्वाखालील 'श्री बहिरदेव ग्रामविकास शेतकरी पॅनेल'ने १३ पैकी ११ जागांवर दणदणीत विजय मिळवत सोसायटीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

या निवडणुकीत सातारा जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील 'श्री भैरवनाथ ग्रामविकास शेतकरी परिवर्तन पॅनेल'ला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. या निकालाने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मालदन गावसह वाड्या-वस्त्या कार्यक्षेत्र असलेल्या या सोसायटीत दोन्ही पॅनेलमध्ये काट्याची लढत झाली. मात्र, मतदारांनी पाटणकर गटाच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला.

निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत परिसर दणाणून सोडला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गीतांजली कुंभार यांनी काम पाहिले.

विजयी उमेदवारांचे सत्यजितसिंह पाटणकर, प्राना फाऊंडेशनच्या डॉ. प्राचीताई पाटील, माजी जि. प. सदस्य रमेश पाटील, मालदनच्या सरपंच सौ. गीतांजली काळे, माजी सरपंच संदीप पाटील, नितीन पाटील (भैय्यासाहेब) यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.

या विजयासाठी मालदनच्या सरपंच सौ. गीतांजली काळे, संदीप पाटील, शामराव काळे, प्रतापराव काळे, अजितराव काळे, जगदीश काळे, वैभव काळे सर, एम. डी. पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

भाजपचे विजयी उमेदवार

सुरेश दिनकरराव काळे, श्रीकांत राजाराम घारगे, जितेंद्र शंकरराव काळे, समाधान शरदराव काळे, पोपट बाळकृष्ण यादव, काशिनाथ लक्ष्मण पानवळ, संजय जोती साबळे, उज्वला भास्कर गायकवाड, खशाबा गणपती गायकवाड, अनिल कृष्णा सपकाळ, पांडूरंग सखाराम नलवडे.

भैरवनाथ पॅनेलचे विजयी उमेदवार

संजय मोहनराव काळे व विमल हणमंत मोरे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !