तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचवड परीसरात अटक
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
भुईंज पोलिस ठाण्यासह सातारा जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात भांडणे हाणामा-यासारखे गंभीर गुन्हे वारंवार केल्याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी संपूर्ण जिल्ह्यातून दोन वर्षे तडीपार केलेला गुन्हेगाराने तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भुईंज पोलिसांनी त्यास पाचवड परीसरात अटक केली आहे.अमर विलास माने वय १९ रा.विराटनगर पाचवड ता. वाई जि. सातारा असे तडीपार केलेल्याचे नाव आहे.
भुईंज पोलिसांच्या माहितीनुसार अमर विलास माने यास ३० सप्टेंबर २०२५ रोजी भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावात वारंवार गुन्हेगारी केल्याबद्दल पोलिस अधीक्षक सातारा यांच्या आदेशानुसार दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले होते.तथापि अमर माने याने तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून पाचवड परीसरात आढळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार ए जी सपकाळ करीत आहेत.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा










