वाई येथे होणार सर्व रोग निदान शिबीर - किसनवीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे
शिवशाही वृत्तसेवा, वाई प्रतिनिधी शुभम कोदे
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंदआबा पाटील व खासदार नितीनकाका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाई येथील मार्केट कमिटीतील शेतकरी सभागृहात मंगळवार दि. २२ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी ३ वाजेपर्यत सर्वासाठी मोफत महाआरोग्य शिबीर, वाई येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये रूग्णांना फळ वाटप तसेच वाई पंचायत समितीमध्ये दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी राष्ट्रवादी युवक कॉग्रेस, मिरज येथील सेवासदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शेद्रे-सातारा येथील ऑन्को लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व वाई येथील ग्रामीण रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबीर, रक्तदान, मोफत मोतीबिंद निदान शिबीर, नेत्र तपासणी व अल्पदरात चष्मे वाटप सकाळी ८.३० ते दुपारी ३ वाजेपर्यत होणार आहेत. यामध्ये संपर्ण शरीराची तपासणी, अत्याधुकि मशीनद्वारे मोफत ई.सी.जी.. हृदयविकार, मेंद विकार, बायपास शस्त्रक्रिया, बी. पी., हिमोग्लोबीन, मधुमेह, एच. आय. व्ही., संसर्गजन्य आजार, टी. बी., सिपिलीस कावीळ, अन्जिओग्राफी, अन्जिओप्लास्टी, तोंडाचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर, फुफुसाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, गर्भाशय मुखाची तपासणी, आतड्याचा कॅन्सर, किडणी व मुत्राशायाचा कॅन्सर, फिट, परेलिसिस, डोकेदुखी, चक्कर, स्नायुंचे आजार, किडनी विकार, हर्निया, मुळव्याध, पित्तशयातील खडे, अपेंडिक्स, पोटांच्या व इतर शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणार आहेत
तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आजारांची मोफत तपासणी करून सर्व प्रकारचे औषधोपचार करण्यात येतील. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास आयोजकांच्यामार्फत आकर्षक भेटवस्तु देण्यात येणार आहे. तसेच सकाळी ११ वाजता ग्रामीण रूग्णालयातील रूग्णांना फळ वाटप होणार असून दुपारी १२ वाजता वाई पंचायत समितीमध्ये दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहितीही प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली.
या आरोग्य शिबीर, पंचायत समितीमध्ये होणाऱ्या दिव्यांगांना साहित्य वाटप व इतर उपक्रमांचा वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्यातील जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहनही, नामदार मकरंदआबा पाटील, खासदार नितीनकाका पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी केले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा