घटनेने परिसरात खळबळ - भुईंज पोलिसांनी केला तपास सुरू
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गलगत असणाऱ्या वाई तालुक्यातील अनवडी गावात एका विहीरीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला असून त्या व्यक्तीचा घात झाला की अपघात या चर्चेने जोशी विहिर,अनवडी, ओझर्डे , शिरगांव, धोम पुनर्वसन, परिसरात या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. अज्ञाताच्या शोधासाठी भुईंज पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
जोशीविहिर जवळ असणाऱ्या अनवडी गावातील शिवारात डोंगर पायथ्याशी असलेल्या एका विहिरीत सोमवारी सकाळी शेतकऱ्यास पाण्यावर तरंगणाऱ्या पुरुष जातीचे प्रेत आढळून आले,त्यानंतर त्यांनी गावचे पोलीस पाटील दिपक गिरी गोसावी यांच्या मार्फत भुईंज पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे व त्यांच्या टीम ने धाव घेत मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले पण रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नाही त्या व्यक्तीचे अंदाजे वय 45 ते 50 असावे अंगात जीन्स पॅंट असून खिशात काही आढळून आले नाही, दरम्यान या मृतदेह बाबत पोलीस पाटील दीपक गिरी यांनी तालुक्यातील इतर गावांचे पोलीस पाटील यांना कळविले आहे.त्या व्यक्तीचा अपघात की घात तसा तपास पोलीस करीत आहेत.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा