maharashtra day, workers day, shivshahi news,

दुचाकी स्वरास पाठीमागून ट्रकने दिली धडक - एक महिला जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भिषण अपघात

Woman killed in accident, pune bengaluru national highway, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वेळे तालुका वाई हद्दीत पुणेहून सातारकडे दुचाकी गाडी नंबर एम एच 11 बी आर 2387 विजय महादेव जाधव व 41 व त्यांची पत्नी सौ दुर्गा विजय जाधव वय 35 राहणार उपळी पोस्ट करंदी तालुका जिल्हा सातारा हे पुण्याहून सातारकडे जात असताना वेळे गावच्या हद्दीत बुधवार दि.११ जून २०२५ रोजीच्या दु ४ ते ४:३० वा.  सुमारास पाठीमागून येणाऱ्या  ट्रक HR 55 X 7573 या ट्रकने जोराची धडक दिल्याने पाठीमागे बसलेल्या दुर्गा विजय जाधव खाली पडून ट्रकचे पुढचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती विजय जाधव हे जखमी झाले. 

अपघाताची माहिती मिळतात भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे,पीएसआय सुरज शिंदे भुईंज पोलीस सुशांत धुमाळ, आप्पा कोलवडकर व महामार्ग पोलीस अधिकारी एपीआय बी.सी वंजारी,व त्यांच्या टीम व सामाजिक कार्यकर्ते मिलिंद पाटील  यांनी घटनास्थळी येऊन जखमींना तातडीने पुढील उपचारास हलवून वाहतूक सुरळीत केली या अपघाताचा तपास हवालदार पोलीस जाधव करीत आहेत.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !