वाई सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभिनव उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेसणाला फार महत्त्व आहे हेच औचित्य साधून वनविभागाच्या अतिरेकी वाई सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या दुतर्फा रस्त्याच्या कडेला व शासकीय व परिसरात व गावातील डोंगर माथ्यावर व मंदिराच्या परिसरात वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनासाठी वडाच्या झाडांचे व इतर वनौषधी झाडांचे महत्त्व कळावे या वृक्ष संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेत येत्या 31 जुलै पर्यंत 2800 या झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट महिलांच्या हस्ते वाई तालुक्यात करण्यात येणार असल्याचे वाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश गोंजारी यांनी बोलताना सांगितले.
याचा शुभारंभ वटपौर्णिमे दिवशी मंगळवार दिनांक 10 रोजी किल्ले रायरेश्वर फाटा ते खावली व धोम बलकवडी ते जांभळी या रस्त्यालगत व डोंगर माथ्यावर व मंदिर परिसरालगत असणाऱ्या गावांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा रस्त्याच्या कडेचा वड पिंपळ बकुळ कांचन चिंच आंबा अशा इतर झाडांचे वृक्षारोपण धरण परिसरात लगत असणाऱ्या गावांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा रस्त्याच्या कडेचा डोंगर माथ्यावर गावातील महिला सरपंच अंगणवाडी सेविका आशाताई आरोग्य सेविका व गावातील महिला व मुली यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेश गोंजारी वृक्षमित्र प्रशांत डोंगरे एल एस साळुंखे कनिष्ठ अभियंता आवळे,गोरे, सावंत, श्रीमती भांगे, अजित शिंदे तसेच परिसरातील सरपंच महिला ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा