maharashtra day, workers day, shivshahi news,

कुंभरोशी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी दिली माहिती

Revenue Solution Camp, shivaji maharaj, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

महाबळेश्वर मंडलातील मौजे कुंभरोशी येथे "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान" शिबीर राबविण्यात आल्याची माहिती महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी दिली. 

महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामिण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांच्या महूसल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी  निकालात काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी मंडळ स्तरावर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबीरामध्ये "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान" बाबत माहिती व शिबीरामध्ये शासनाच्या निर्देशाप्रमाणे पुढीलप्रमाणे दाखले व इतर सेवा पुरविण्यात आल्या असल्याची माहिती तहसिलदार  तेजस्विनी  पाटील यांनी दिली. 

7/12, खाते उतारे व फेरफार नक्कल वाटप संख्या: -42, तहसिल कार्यालय व ग्राम महसूल अधिकारी यांचे मार्फत रहिवासी दाखले वाटप संख्या:-172, तहसिल कार्यालय व ग्राम महसूल अधिकारी यांचे मार्फत उत्पन्नाचे दाखले वाटप संख्या:- 113, दुबार शिधापत्रिका वाटप संख्या:- 178, ग्राम महसूल अधिकारी यांच्या मार्फत शासकीय येणे बाकी दाखला वाटप संख्या: 54, संजय गांधी निराधार सर्व योजनांची माहिती देवून अर्ज प्राप्त करुन घेण्यात आले, पीएम किसान योजना व शेतकरी नोंदणी संच बाबत नोंदी घेण्यात आल्या व पीएम किसान योजनेच्या,अनुषंगाने अडीअडचणी दूर केल्या, मयत वारस नोंदीबाबत कामकाज केले. 

तहसिलदार  तेजस्विनी  पाटील यांच्याहस्ते दाखले व शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. तसेच स्थानिक अडीअडचणीचे निवारण केले. सदर शिबीर कार्यक्रमामध्ये कुंभरोशी भागातील नजीकच्या गावातील शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.  तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच मंडलाधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांनी कामकाज केले.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !