जिल्हाध्यक्ष दता गाडगे यांचा राज्यस्तरिय उत्कृष्ट संघटक पुरस्काराने गौरव

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वतीने केला सन्मान

Datta Gadge State Level Award, parner, ahilyannagar, ahamadnagar, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)

पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील पत्रकार व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष   दत्ता गाडगे यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई ते वतीने 2025 चा राज्यस्तरीय उत्कृष्ट संघटक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आयोजित, रौप्य महोत्सवी अधिवेशन रविवार दिनांक 15 जून रोजी संत एकनाथ सभागृहात उत्साहात पार पडले. 

या अधिवेशनाचे उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुल सावे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तर राज्याचे समाज कल्याण मंत्री नामदार संजय शिरसाट यांच्या हस्ते राज्यभरातील कर्तुत्वान व्यक्तींना मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने राज्यांमध्ये संघटना बांधण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पदाधिकाऱ्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट संघटक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे पत्रकार संघाचे अहिल्यानगर  जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे यांना सन 2025 चा उत्कृष्ट  संघटक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी महामंडलेश्वर  स्वामी शांतिगिरीजी महाराज, महाराष्ट्र लघुउद्योग महामंडळ अध्यक्ष जयदीप कवाडे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय केनेकर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक संजय भोकरे, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, माजी अध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश सचिव डॉ. विश्वासराव आरोटे, एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक, प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे डिजिटल मीडियाचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष अनिल सावंत,छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष डॉक्टर छबुराव ताके, ज्येष्ठ पत्रकार मधुकर अण्णा वैद्य, आपण नंदकुमार घोडके, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव आदिसह जिल्हाध्यक्ष,राज्यातील प्रमुख पदाधिकारी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री आमदार अतुल सावे म्हणाले, पत्रकारांशी संवाद साधताना प्रत्यक्ष शब्द हा जबाबदारीने वापरावा लागतो कारण पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. वडिलांच्या पूर्वीच्या संस्कारामुळे आजही मी माझ्या मुलांसोबत दररोज पेपर वाचतो. म्हणून भारतीय माध्यमे ही सक्षम व्हायला हवीत असे असावे म्हणाले.

याप्रसंगी बोलताना राज्याचे समाज कल्याण मंत्री ना.संजय शिरसाठ म्हणाले, आपण सलग 40 वर्ष राजकारणामध्ये जेवढी मेहनत घेतली तेवढीच मेहनत मला पुढे नेण्यासाठी पत्रकार बांधवांनी घेतली आहे. माझ्या या वाटचालीत पत्रकार बांधवांचा मोठा वाटा आहे. आपण सलग 40  वर्ष केलेल्या कामामुळे इथपर्यंत पोहोचलो आहोत. आपोआप पोहोचलो नाही.त्यामुळे

पत्रकार बांधवांनी आमच्यातील चांगल्या गोष्टींचाही बातमीदारी साठी विचार करायला हवा असे सांगत रौप्य महोत्सवी अधिवेशना साठी पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आमदार संजय केनेकर,महाराष्ट्राचे पत्रकार संघाचे संस्थापक संजय भोकरे, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे आदींनी मनोगत व्यक्त केले. पुरस्कारानंतर माध्यमांशी बोलताना महाराष्ट्राचे पत्रकार संघाचे  अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे म्हणाले, सुरुवातीपासून आपण संघटना बांधणीसाठी केलेल्या कामाची ही पावती आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी अजून वाढलेली आहे. महाराष्ट्राचे पत्रकार संघामध्ये कार्यरत असताना, तालुकाध्यक्ष जिल्हा सचिव जिल्हाध्यक्ष अधिपदांवर संघटनेने मला काम करण्याची संधी दिली तिचा सोनं होताना पाहताना मनस्वी आनंद होत आहे. येथे भविष्य काळामध्ये सुद्धा संघटना बांधण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत आणि संघटना जी जबाबदारी देईल ती सांभाळण्यासाठी तयार आहोत.

यावेळी पारनेर तालुक्यातून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेश खोसे, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड,तालुकाध्यक्ष संतोष तांबे, lसचिव संतोष कोरडे, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे, तालुका खजिनदार नितीन परंडवाल, तालुका सहसचिव ऍड.सोमनाथ गोपाळे, पारनेर अध्यक्ष गायकवाड आदींसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !