maharashtra day, workers day, shivshahi news,

घनकचरा व्यवस्थापन अतिक्रमण व भंगार घोटाळ्यावर शिरूर नगर परिषदेने १५ दिवसांत खुलासा द्यावा

जिल्हा सहआयुक्त (नगर पालिका प्रशासन) व्यंकटेश दुर्वास यांचा आदेश

City Council should clarify on scam, shirur, pune, mns, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)

शिरूर नगर परिषदेच्या सुमारे तीस ते चाळीस लाख रूपये किंमतीच्या भंगाराची परस्पर विल्हेवाट, फूटपाथ व पूररेषेतील अतिक्रमणे, घनकचरा व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने होत नसल्याच्या तक्रारींसह विविध प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासनाने येत्या १५ दिवसांत बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सहआयुक्त (नगर पालिका प्रशासन) व्यंकटेश दुर्वास यांनी शिरूर नगर परिषदेस दिले असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद व शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

भंगार साहित्याची चोरी, अतिक्रमणे, नगर परिषदेतून वीजचोरी, भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण मोहिमेतील घोटाळा, अनधिकृत मोबाईल टॉवर, बेकायदा पार्कींग आदी विषयांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सय्यद दहा जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तक्रारींची दखल घेतली गेल्याने त्यांनी शुक्रवारी (ता. १३) चौथ्या दिवशी उपोषण सोडले.

आंदोलनातून मार्गी लागलेल्या विषयाची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. आम्ही शिरूरकर फाऊंडेशनचे अध्यक्ष रवींद्र बापू सानप, मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे, शहर अध्यक्ष ॲड. आदित्य मैड, शहर संघटक रवीराज लेंडे, अण्णा दौंडकर, राजेंद्र महाजन, रामभाऊ इंगळे, गणेश जगताप आदी यावेळी उपस्थित होते. 

नगर परिषदेतीलच एका अधिकाऱ्याने काही लोकांना हाताशी धरून लाखो रूपयांच्या भंगार साहित्याची परस्पर विल्हेवाट लावली असल्याच्या आमच्या तक्रारीची दखल घेत तक्रारीच्या अनुषंगाने येत्या १५ दिवसांत बैठक घेऊन कागदपत्रे व पुरावे तपासून पुढील उचित कार्यवाहीचे आश्वासन नगर परिषदेने दिले असल्याचे सय्यद यांनी सांगितले. याप्रकरणी नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक डी. टी. बर्गे यांना सोमवार (ता. १६) पासून सक्तीच्या रजेवर पाठविले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे, असे ते म्हणाले. 

शहरातील पदपथावरील, पूररेषेतील अतिक्रमणे हटविण्याच्या मागणीबाबत नगर परिषदेने सकारात्मकता दर्शविली असून, अतिक्रमणधारकांसह नैसर्गिक नाल्यांवरील अनधिकृत बांधकाम धारकांना नोटीसा बजावल्या असल्याचे व पोलिस बंदोबस्तासाठी पत्रव्यवहार केला असून, बंदोबस्त मिळताच अतिक्रमणे काढली जातील, असे आश्वासन दिले असल्याची माहिती बांडे यांनी दिली. 

घनकचरा प्रक्रिया शास्त्रोक्त पद्धतीने न करता चुकीची बीले काढल्याच्या आमच्या तक्रारीचीही नगर परिषदेने दखल घेतली आहे. ज्या ठेकेदाराला हे काम दिले आहे त्यासोबतच्या अटी व शर्तींची तपासणी करून दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे. 

बेकायदा पार्किंगबाबतची पोलिसांच्या मदतीने कार्यवाही, अनधिकृत मोबाईल टॉवर धारकांना नोटीसा, जीओ टॉवरकडून दुप्पट कर आकारणी, सांडपाणी व मलनिस्सारण प्रकल्प दुरूस्ती व नवीन मशिनरी, शहरातील रस्त्यांच्या कामांची चौकशी करून कार्यवाहीचे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण विषयात मोठा आर्थिक घोटाळा झाला असून, त्याबाबत नगर परिषदेने दिलेल्या उत्तराने समाधान झालेले नाही. या विषयातील पुरावे गोळा करून पूरक माहिती प्रशासनाला देताना प्रलंबित विषयांबाबत पाठपुरावा सुरूच राहिल.

- महिबूब सय्यद, 

उपाध्यक्ष, पुणे जिल्हा मनसे

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !