आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
पोलीस अधीक्षक सातारा तुषार दोशी, व अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, यांनी आगामी बकरी ईद व श्री. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळयाच्या अनुशंगाने विनापरवाना शस्त्र बाळगणारे इसम व हददपार इसमांची माहिती काढुन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा अरुण देवकर यांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सपोनि रोहित फाणे यांचे अधिपत्याखाली विशेष पथक तयार करुन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
दि.5. जून 2025 रोजी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सातारा अरुण देवकर यांना त्यांच्या खास खबऱ्या मार्फत बातमी मिळाली की, मोक्क्यातुन जामीनावर सुटलेले व सातारा जिल्हयातुन तडीपार असलेले इसम अमीत ऊर्फ बिऱ्या कदम रा.लोणी, ता.खंडाळा, जि. सातारा व विशाल महादेव चव्हाण रा. भोळी ता. खंडाळा, जि. सातारा हे त्यांचेकडील मारुती सुझुकी कंनीपीची एक्सल 6 मॉडेलची राखाडी रंगाची कार क्रमांक एमएच-12-टीएस-1889 मधुन निरा ते लोणंद जाणारे रोडवर देशी बनावटीची पिस्टल व जिवंत काडतुसे विक्री करणे करीता येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थागुशा अरुण देवकर यांनी सपोनि रोहित फाणे यांना त्यांच्या पथकासह नमुद ठिकाणी जावुन कारवाई करणेच्या सुचना दिल्या, त्याप्रमाणे तपास पथकाने लोणंद ते निरा जाणारे रोडवरील रेल्वे पुलावर सापळा लावुन कार क्रमांक एमएच-12-टीएस-1889 मधील तडीपार गुंडाना ताब्यात घेवुन त्यांचेकडून 6 देशी बनावटीची पिस्टल (अग्नीशस्त्र), 6 मोकळ्या मॅग्झीन, 30 जिवंत काडतुसे, 2 मोबाईल हॅन्डसेट व कार असा एकुण 15,80,000/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला असुन नमुद दोन्ही इसमांवर लोणंद पोलीस स्टेशन मध्ये अवैध शस्र बाळगुन तडीपारीचा भंग केल्या बाबत गुन्हा नोंद केलेला आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी सातारा जिल्हयातील हद्दपार व तडीपार इसम व अवैध अग्नीशस्त्रे बाळगणारे इसम यांचेवर यापुढे करडी नजर ठेवुन मिळुन आल्यास त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात येईल.
सदरच्या कारवाई मध्ये पोलीस अधीक्षक सातारा श्री. तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती डॉ. वैशाली कडुकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सपोनि रोहित फार्णे, पोउनि परितोष दातिर, विश्वास शिंगाडे, सफौ. अतीष घाडगे, पोहवा विजय कांबळे, शरद बेबले, लेलैश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, अमित सपकाळ, अमित माने, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, गणेश कापरे, मोहन पवार, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर, लोणंद पोलीस स्टेशनकडील पोउनि श्री. घुले, धुमाळ, नाना भिसे, अतुल कुंभार, सायबर पोलीस स्टेशनकडील पोकों यशवंत घाडगे, यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे. सहभागी अधिकारी अंमलदार यांचे पालीस अधीक्षक सातारा, व अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा