पिक नुकसानीची केली पाहणी
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा आणि शेंदुर्जन मंडळात ३ एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे कांदा, मका आणि आंबा पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी ४ एप्रिल रोजी आमदार मनोज कायंदे यांनी संबंधित गावांना भेट दिली आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. दरेगावपासून दौरा सुरू करताना, दरेगाव येथील नरहरी विश्वनाथ बंगाळे यांच्या शेतातील कांदा पूर्णपणे नष्ट झाला आहे, कारण वादळी वाऱ्यामुळे दोन एकरावरील कांदा भूईसपाट झाला.
आमदार मनोज कायंदे यांनी तहसीलदार अजित दिवटे आणि कृषी अधिकारी गोपाल बोरे यांना शेतकऱ्यांचे नुकसानीचे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले, तसेच शेतकऱ्यांना नुकसानीपासून वंचित राहू न देण्याची अपेक्षा व्यक्त केली. शेंदुर्जन येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयाची पाहणी केली, जिथे वाऱ्यामुळे टिनपत्रे उडाली आणि शोभा खुशालराव शिंगणे जखमी झाल्या. सायाळा येथील सोपान आव्हाळे आणि पिंपळगाव सोनार येथील मारुती साखरे यांच्या शेतातील पिकाचे नुकसान झाले. जागदरी, आंबेवाडी, कंडारी आणि भंडारी येथील शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा