maharashtra day, workers day, shivshahi news,

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्हा परिषद कवठे शाळेच्या दोन विद्यार्थ्यांची निवड

वर्गशिक्षिका सीमा सुभाष डेरे यांनी केले मार्गदर्शन

javahar navoday vidyalaya, zp school kavathe, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत जवाहर नवोदय केंद्रीय विद्यालय माहुली साताराच्या प्रवेश प्रक्रीयेसाठी स्पर्धात्मक प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यंदा या प्रवेश प्रक्रियेसाठी दहा हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. 

या मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवठेच्या दोन विद्यार्थ्यांनी यश मिळविले यापैकी कु आर्यन सचिन जगताप याने सर्वसाधारण प्रवर्गातून तर राजवीर निलेश शिंदे यांची इतर मागास प्रवर्गातून गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याने या दोघांची निवड झाली. प्रत्येक वर्षी कवठे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी या परीक्षेत यश मिळवून जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवत असतात.

त्यांना वर्गशिक्षिका सीमा सुभाष डेरे यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल वाई पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी हर्षवर्धन मोरे, विस्तार अधिकारी वाळेकर, विष्णू जगताप, केंद्रप्रमुख संदेश कांबळे, मुख्याध्यापक शालिनी कांबळे, सर्व शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय पोळ व समिती सदस्य, कवठे सरपंच मंदाकिनी पोळ, उपसरपंच शिवाजी डेरे तसेच सर्व सदस्य,भैरवनाथ व किसन वीर विकास सोसायटी संचालक तसेच कवठे व बोपेगाव ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !