ग.दि. माडगूळकरांच्या बामणाचा पत्रा येथे पार पडला प्रकाश यांचा समारंभ
शिवशाही वृत्तसेवा, आटपाडी
रविवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी बामणाचा पत्रा माडगुळे येथे शिदोरी साहित्य संमेलन ,पुरस्कार वितरण,परिसंवाद, कवीसंमेलन आणि पुस्तक प्रकाशन समारंभ उत्साहात पार पडला.
कृष्णकांत कुलकर्णी लिखित घात या कादंबरीचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. माडगूळ परिसरात या कादंबरीची सुरुवात होते. महाराष्ट्रातील पारधी समाज जीवनावर ही कादंबरी आधारित आहे. महाराष्ट्रातील पारधी समाजाला पूर्वापारपासून चोर जमात संबोधले जाते मात्र या समाजाच्या आयुष्यातील खडतर प्रवास या कादंबरीत मांडला आहे. कुठलाही समाज पूर्णपणे वाईट नसतो तर त्यातही काही लोक असतात जे आपली वेगळी वाट निर्माण करतात हा या कादंबरीचा विषय आहे. अतिशय सोप्या शब्दात गंभीर विषय मांडणारी ही कादंबरी आहे.
अमरसिंह देशमुख, ॲड.रविंद्र माडगूळकर, गोव्याचे कवी दत्तप्रसाद जोग, साहित्यिक जयवंत आवटे,ॲड. सुभाषबापू खोत, माडगुळेच्या सरपंच सौ.संगीता गवळी, विठ्ठल गवळी, संजय विभूते, बापू विभूते, गझलकार सुधाकर इनामदार, माडगुळे सोसायटीचे चेअरमन, उपसरपंच साहेबराव चवरे, आनंद हरी, विनायक कुलकर्णी , धर्मेंद्र पवार, कवी सचिन कुलकर्णी इत्यादी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.
वेगळ्या विषयावर असलेली ग्रामीण जीवनाचे चित्रदर्शी वर्णन करणारी आणि एका दुर्लक्षित असलेल्या भटक्या विमुक्तांचा जीवनपट मांडणारी कृष्णकांत कुलकर्णी लिखित ही कादंबरी वाचकांच्या पसंतीस उतरेल असा आशावाद यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा