ग्रामीण भागात सुध्दा वाढलीय मोबाईल समस्या
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
ग्रामीण भागात लहान मुलाच्या मोबाईल वापरात व स्क्रीनसमोर अतिप्रमाणात वेळ घालवल्यामुळं मुलांच्या मेंदूच्या रचनेत बदल होऊ शकतात, असं या संशोधनातून दिसून आलं आहे. विशेषतः, मुलांच्या मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये बदल दिसून आले आहेत. विचारशक्ती, निर्णयक्षमता आणि वर्तन यांवर ते परिणाम करू शकतात. याशिवाय, अधिक स्क्रीन टाइममुळं झोपेच्या पद्धतींवरही परिणाम होतो.अगदी कोवळ्या वयातच मुलांच्या हातात स्मार्टफोन किंवा टॅबलेट देऊन त्यांच्या ज्ञानात भर पडेल किंवा त्याला डिजिटल जगाची ओळख होईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खूप चुकीचा विचार करताय.
तंत्रज्ञान क्रांतीमुळे हल्ली तरुणाईसह लहान मुलेही इंटरनेट गेममध्ये गरफटू लागली आहेत. सवयीच्या आहारी गेल्याने त्याची व्यसनात परिणिती होत असल्याने या मुलांचा कुटुंबासह मित्रपरिवाराशी सुसंवाद हरवत आहे. एकलकोंडी झाल्याने या मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले असून शैक्षणिक भविष्य टांगणीला लागत आहे. सुज्ञ पालकांनी वेळीच इंटरनेट गेमची सवय सोडवण्याची गरज आहे, असे मत मानसोपचार तज्ञांनी व्यक्त केले आहे . हल्ली तरुणाईसह अजाणत्या वयातील मुलांना इंटरनेट गेमचे व्यसन जडल्याने पालक त्रस्त झाले आहेत. कुटुंब, मित्र परिवाराशी संवाद हरवत चालल्याने सामाजभानही हरपत आहे. त्यातून काही कुटुंब, मित्र परिवाराशी संवाद हरवत चालल्याने सामाजभानही हरपत आहे. त्यातून काही विघात कृतींना बळ मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पालकांनी विशेष काळजी घेत मुलांना अभ्यासाव्यतिरीक्त मोबाईल देणे टाळावे. तसेच मुलांच्या सोशल वापर व सर्चिगवर लक्ष द्यावे, मुलांना मैदानी व बुध्दीला चालना देणाऱ्या खेळांकडे वळवावे, असा सल्ला मानसोपचार तज्ञांनी दिला आहे. दरम्यान, इंटरनेट ही सध्याच्या जीवनशैलीतील अत्यावश्यक बाब असली तरी त्याच्या वापरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.सतत मोबाईल बघणं आणि ऑनलाइन असण्याचे फक्त मानसिक किंवा भावनिक परिणाम होतात असं नाहीय. सतत एका जागेवर बसून मोबाईलच्या छोट्या स्क्रीनवर गोष्टी बघत राहण्याचे किंवा टीव्हीवर काहीतरी बघत बसण्याचे शारीरिक परिणामही गंभीर असू शकतात.
आजच्या डिजिटल-युगात मुलांच्या हातात स्मार्टफोन, टॅब्लेट आणि लॅपटॉप लवकरच येतो आणि तासन् तास या साधनांवर मुलं वेळ घालवतात. जेवताना मुलांच्या समोर स्क्रीन नसेल तर त्यांना जेवण जात नाही. मुळात स्क्रीन नसेल तर जेवायलाच आवडत नाही अशी अनेक घरांमधून परिस्थिती आहे. याचा शारीरिक स्वास्थ्यावरही प्रचंड परिणाम होत आहे, असं अनेक अभ्यासांतून आता पुढं आलेलं आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा