राज्यातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई : वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ. अरूणादेवी शशिकांत पिसाळ यांच्या प्रचारार्थ शरदचंद्र पवार यांची जाहीर सभा आज दी. १६ नोव्हेंबर दुपारी १ वाजता महात्मा फुले भाजी मंडई,वाई येथे होणार असून सभेस
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय खासदार निलेश लंके, धैर्यशील मोहिते पाटील, संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे यावेळी प्रमुख वक्ते म्हणून किरण माने शिवसेना (उबाठा) हे उपस्थित राहणार आहेत. तरी सभेस सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन माजी जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, तालुका समन्व्यक प्रसाद सुर्वे, तालुका अध्यक्ष दिलीप बाबर, तालुका प्रमुख दत्तात्रय इथापे, प्रताप यादव, अनिल जगताप, रमेश धायगुडे, डॉ. नितीन सावंत, सर्फराज बागवान, रामदास कांबळे, अजित यादव, डी. एम. बावळेकर, सुभाष कारंडे, संतोष जाधव, बंडूशेठ कुंभारदरे, आकाश कोंढाळकर आदिसह महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा