देवस्थानचे अध्यक्ष व माजी मंत्री अशोकराव सावंत यांच्या प्रयत्नांना यश
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
पारनेर तालुक्यातील पिंपळनेर महाराष्ट्रातील संत परंपरेतील शेवटचे संत म्हणून प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र पिंपळनेर येथील श्री संत निळोबाराय देवस्थान च्या सर्वांगीन विकास कामांसाठी देवस्थानचे अध्यक्ष व माजी मंत्री अशोकराव सावंत यांच्या खास आग्रहास्तव राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना . अजित पवार यांनी ७ कोटी १६ लाखांचा भरभक्कम निधी ला मंजूरी देवून तो त्वरीत नगर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा कोषागरात वर्ग केल्याचे पत्र अध्यक्ष अशोकराव सावंत यांच्या कडे सुपूर्त केले.
भारत देश स्वतंत्र्य झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर नगर जिल्ह्यात प्रथमच राज्य सरकारने एवढा मोठा भरक्कम निधी श्री क्षेत्र पिंपळनेर दिल्याने गावाचे नंदनवन झाल्या शिवाय राहणार नाही . श्री श्रेत्र पिंपळनेर ला वारकरी संप्रदायात धाकटे पंढरपूर नगरी म्हणून संबोधले जाते . याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी श्री संत निळोबाराय देवस्थानच्या विकासासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना अजित पवार यांनी राज्यस्तरीय तीर्थ क्षेत्र ब वर्ग अंतर्गत ३ कोटी ५१ लाख ६३७ रुपये आणि राज्यस्तरीय पर्यटन स्थळ विकासांतर्गत या तीर्थक्षेत्रास ३ कोटी ६५ लाख रुपये असा एकूण निधी ७ कोटी १७ लाख ६३७ रुपये एवढा भरीव निधी विकास कामांसाठी नगर जिल्हाधिकारी कार्यालयातील कोषागार मध्ये वर्ग केला आहे . तसा राज्य शासनाने अधिकृत आदेशाचे परिपत्रक काढले असून नगर जिल्हा अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पाठवले आहे , श्री क्षेत्र पिंपळनेरच्या श्री संत निळोबाराय संस्थानांचे अध्यक्ष व माजी मंत्री अशोकराव सावंत व संत निळोबाराय चे वंश वंशज व संस्थांचे कार्याध्यक्ष गोपाळ काका मकाशीर , भाऊसाहेब लटांबळे , विणेकरी पांडुरंग रासकर , पंढरीनाथ गुंजाळ , सर्व विश्वस्त व संपतराव गाजरे , गोरक्ष गाजरे , राजेंद्र रासकर , माजी उपसरपंच व संस्थांचे सचिव एल व्ही खामकर सर , चांगदेव शिर्के सर , बाळासाहेब गाडे , बी व्ही लटांबळे , अजिंक्य सावंत , विक्रांत गाजरे , हर्षल गाजरे पाटील , बाबासाहेब पवार सर , वैभव राव गाजरे व सर्व ग्रामस्थ यांच्या हस्ते मंत्रालयात उपमुख्यमंत्री ना अजित पवार यांचा भव्य सत्कार करण्यात आला . यावेळी उपमुख्यमंत्री ना . पवार यांनी निधी मंजूरी च्या आदेशाची प्रत ताब्यात दिली .
श्री संत निळोबाराय परिसरात भक्त निवासाचे बांधकाम करणे कामी १ कोटी ३६ लाख १९ हजार ३९९ रुपये , प्रवचन हॉल बांधकाम करणे कामी १ कोटी ८४ हजार ९८९ रुपये , प्रसादलयाचे बांधकाम करणे कामी ४९ लाख ७१ हजार ३५० रुपये , मंदिर परिसरातील नंबर १ चा रस्ता सिमेंट काँक्रिटी करण करणे कामी ६४ लाख २४ हजार ९८९ रुपये हे तीर्थक्षेत्र योजने अंतर्गत कामे करण्यात येणार असून पर्यटन अंतर्गत श्री संत निळोबाराय मंदिर तीर्थक्षेत्राच्या दर्शनी भागावर ३ प्रवेशद्वारासाठी २६ लाख ४३ हजार रुपये , संत निळोबाराय मंदिर परिसरात रस्ता सिमेंट कॉंक्रिटी करण रस्ता नंबर २ चा सिमेंट कॉंक्रिटी करण्यासाठी ६४ लाख २५ हजार रुपये , संत निळोबाराय उद्यानात उद्यानामध्ये सिमेंटचे पेव्हिंग ब्लॉक बसवण्यासाठी ९ लाख ३७ हजार रुपये , संत निळोबाराय उद्यानातील गार्डन व मंदिर परिसरातील सुशोभी करणासाठी १९ लाख ९ हजार रुपये , संत निळोबाराय मंदिरपासून ते दशक्रिया विधीच्या घाट बांधणी साठी नदी तीरावर १ कोटी २ लाख ३८ हजार रुपये , मंदिर परिसरात दर्शन बारी बांधण्यासाठी १ कोटी २३लाख रुपये , संत निळोबाराय मंदिर परिसरातील पथदिवे व रस्त्याच्या कडेने दिवाबत्ती साठी २० लाख ३३ हजार रुपये या ११ विकास कामांसाठी ७ कोटी १७ लाख ६३७ रुपयांचा भरीव निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपळनेर नगरीचे नंदनवन करण्यासाठी दिला आहे , महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदायाच्या वतीने पिंपळनेर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे कौतुक व आभार मानण्यात येत आहे त्या निमित्ताने पिंपळनेर ग्रामस्थांनी त्यांची भेट घेत , त्यांचे ऋण व्यक्त करून त्यांचा सत्कार केला व मनःपूर्वक आभार मानले आहे.
श्री क्षेत्र पिंपळनेर च्या श्री संत निळोबाराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व माजी मंत्री अशोकराव सावंत हे राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना.अजित पवार यांचे खंदे समर्थक असल्याने त्यांनी या देवस्थान च्या विकासासाठी मोठा भरीव निधीला तर मंजूरी दिलीच, पण त्याचबरोबर निधी वर्ग केल्याचे पत्रच अध्यक्ष सावंत, विश्वस्त व ग्रामस्थांच्या हातात देवून सर्वांना सुखद धक्का दिला. या भरीव निधी मुळे संत निळोबाराय देवस्थान व श्री क्षेत्र पिंपळनेरचा चेहरा मोहराच बदलणार आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा