जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा - तहसीलदार सोनाली मेटकरी यांचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाईच्या तहसिल कार्यालयात महसुल पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे .या साठी बुधवार दि .७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे . या दिवशी वाई तालुक्यातील सर्व शेतकरी वर्गातील लोकांच्या मंडलाधिकारी अथवा गाव कामगार तलाठी यांच्या कडे फेरफारा साठी काही नोंदी अडकल्या आहेत अथवा नवीन फेरफार नोंद करावयाची आहे या नोंदी का झाल्या नाहीत याची माहिती घेण्यासाठी या दिवशी. दिवसभर वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी या उपस्थित राहणार आहेत .
या वेळी तालुक्यातील सर्व मंडलाधिकारी आणी गाव कामगार तलाठी हे उपस्थित राहणार आहेत तरी या दिवशी तालुक्यातील ज्या शेतकरीवर्गाच्या फेरफाराच्या नोंदी झाल्या नाहीत अशा शेतकरीवर्गानी या फेरफार अदालत मध्ये आपल्या पुराव्याची सर्व आवश्यक कागदपत्रं घेवुन उपस्थित राहुन आपल्या फेरफारांच्या नोंदी करुन घ्याव्यात असे आवाहन वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी केले आहे .
राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्या साठी महसुल विभागा मार्फत संपुर्ण राज्यभर १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट असा महसुल पंधरवडा दिन म्हणुन साजरा केला जातो .या कालावधीत मंडलाधिकारी अथवा गाव कामगार तलाठी यांच्याकडे प्रलंबित असणारी कामे सहजरीत्या मार्गी लावली जातात अशीही माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली आहे.
तरी बुधवार दि. ७ ऑगस्ट रोजी भरणाऱ्या फेरफार अदालतीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन नायब तहसीलदार वैशाली जायगुडे यांनी केले आहे. या वेळी वाई तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी व तलाठी फेरफार अदालत मध्ये उपस्थीत राहुन महसुल बाबत नविन नोंद घालने, फेरफार मंजुरी करणे इत्यादी. कामांचा निपटारा करणार आहेत.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा