भारत वर्षात शेतीत रासायनिक खताचा प्रचंड वापर वाढला आहे.
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी, शिवाजी कुंटूरकर
भारत वर्षात शेतीत रासायनिक खताचा प्रचंड वापर वाढला आहे. यामुळे मानवी जीवन असाध्य रोगराईला कारणीभूत होत आहे. व जमिनीचा पोत ही खालावत आहे. यासाठी रासायनिक खता ऐवजी जैविक खताचा वापर काळाची गरज असल्याचे मत नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डाॅ. व्यंकटेश काब्दे यांनी व्यक्त केले आहे.
डाॅ. व्यंकटेश काब्दे हे सायन्स कॉलेज नांदेड येथे आयोजित ईको फ्रेंडली कमिटी व प्राणिशास्त्र विभाग सायन्स कॉलेज नांदेडच्या वतीने आयोजित गांडूळखत निर्मिती प्रकल्प उद्घाटन प्रसंगी बोलत होते. सायन्स कॉलेज परिसरात पडणाऱ्या जैविक कचर्या पासून तब्बल 7 क्विंटल गांडूळखत निर्मिती करण्यात आला. हे कार्य ईको फ्रेंडली कमिटी व प्राणिशास्त्र विभाग यांच्या संयुक्त सहभागातून पूर्णत्वास आले. यासाठी सायन्स कॉलेजचे प्राचार्य डि. यू. गवई, उपप्राचार्य डाॅ. एल.पी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. एस.एम. कदम यांच्या विद्यार्थी मार्गदर्शन व नियोजनाखाली सायन्स कॉलेजच्या क्रियाशील विद्यार्थी सहभागातून 7 क्विंटल गांडूळखत निर्मितीचा प्रकल्प यशस्वी झाला.
याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी उपक्रमशील प्राध्यापक प्रा. सुनिल मोहनराव कदम व त्यांच्या समवेत सहभागी विद्यार्थी यांचे तोंडभर कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा हि दिल्या. यावेळी सायन्स कॉलेजचे प्राचार्य डि.यु. गवई, उपप्राचार्य एल. पी. शिंदे, प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ किरण शिलेवार, डाॅ. चव्हाण, प्रा.जाधव, प्रा. आचेगावे यांचेसह महाविद्यालयीन विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
सायन्स कॉलेज नांदेड येथील इको फ्रेंडली कमिटी व प्राणिशास्त्र विभागाचा अभिनव उपक्रमसायन्स कॉलेजचे प्राचार्य डि.यु.गवई यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयीन परिसरात साचणाऱ्या टाकाऊ जैविक कचर्या पासून उपक्रमशील प्रा. सुनिल मोहनराव कदम यांच्या पुढाकारातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने तब्बल 7 क्विंटल गांडूळखताची निर्मिती करून दिला प्राकृतिक समतोलाचा संदेश....
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा