प्रकट दिनानिमित्त शिरूर शहरामध्ये अन्नदान
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर जिल्हा प्रतिनिधी फैजल पठाण
माघ वद्य सप्तमी म्हणजे 23 फेब्रुवारी 1878 रोजी बुलढाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले असे सांगितले जाते
" गण गण गणात बोते"!
हा श्री संत गजानन महाराज यांचा आवडता मंत्र त्याचा ते अखंड जप करत असत. महाराजांचे लाखो भक्त यथाशक्ती हा मंत्र जप करत असतात. गजानन महाराजांचे चरित्र अनेक प्रकारच्या चमत्कारिक कथांनी भरलेले आहे असे सांगितले जाते. दुःख ,अडचणी दूर करण्यासाठी आपल्या भक्तांना हा मंत्र दिला अशी भक्तांची श्रद्धा आहे. हा मंत्र नसून भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव आहे असे भक्त सांगतात.
पहिला गण म्हणजे "जीव", दुसरा गण म्हणजे "शिव", गणात म्हणजे "हृदयात", "बोते" म्हणजे बघा . प्रत्येकाने हृदयात परमेश्वर बघायला शिका तो तुमच्यात नाहीतर प्रत्येक जीवात्म्याच्या ठाई आहे त्याचा आदर करा. ज्याला परमेश्वराचे रूप पाहता आले तो कुणाशी वाईट वागणार नाही आणि स्वतः वाईट कृत्य करणार नाही.
"गण गण गणात बोते"! म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांची भेट होणे. अशी माहिती यावेळी त्यांचे भक्त जन सांगत होते.
यावेळी पुणे जिल्ह्यातील शिरूर शहर या ठिकाणी तीन मार्च 2024 रोजी पंचायत भवन येथे श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त रमाकांत कुंदनमल बोरा, प्रदीप रमाकांत बोरा ,जगदीश रमाकांत बोरा, विकास रमाकांत बोरा , सुरेखा बोरा, कविता बोरा, पुनम बोरा, जयाताई मुथा, सोनाली बोरा या कुटुंबाच्या वतीने दरवर्षी अन्नदान तसेच चरित्र कथा व पूजा पाठ करण्यात येते.
यानिमित्ताने अनेक भाविक भक्त या अन्नदान व महाप्रसादाचा लाभ घेतात. ही सेवा गेल्या चार वर्षापासून अखंड चालू आहे. असे यावेळी बोरा परिवाराच्या वतीने सांगण्यात आले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा