maharashtra day, workers day, shivshahi news,

श्री सद्गुरू सेवा समिती आयोजित सनातन धर्मोत्सव चतुर्वेद पारायण सांगता संपन्न

विविध साधु -संत महंतांच्या उपस्थितीत पुर्णाहुती सोहळा उत्साहात संपन्न 
Sanatan Dharmatsav Chaturveda Parayana concluded ,  Shri Sadguru Seva Samiti , Hingoli , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य

भविष्यात देखील भव्य दिव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करणार - श्री सद्गुरू सेवा समिती अध्यक्ष - लक्ष्मीकांत पाठक

 

 हिंगोली - शहरातील श्री सद्गुरू सेवा समितीच्या वतीने सनातन धर्मोत्सव चतुर्वेद पारायण व यजूर्वेद स्वाहाकाराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात दि.११ मार्च रोजी झाली होती व सांगता दि. १४ मार्च रोजी संपन्न झाली . कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात संपन्न कार्यक्रमाची ठिकाणी ज्या ज्या भक्तांनी भेट दिली त्यांना अध्यात्माची अनुभुती घेता आली आहे. दि. ११ मार्च ते १४ मार्च दरम्यान रोज सकाळी ८ ते १ स्वस्ति पुण्याहवाचन, चतुर्वेद पारायण, स्वाहाकार आदी कार्यक्रम संपन्न झाले दि. १२ मार्च रोजी कुंकु मार्चन सोहळा देखील भव्य दिव्य संपन्न झाला तसेच आनंदोत्सव म्हणून दिपोत्सव सोहळा देखील संपन्न झाला पुर्णाहुती सोहळा दरम्यान उटी ब्रम्हचारी संस्थानचे सुरेश महाराज, खटकाळी हनुमान मंदिर चे महंत भगवान दास महाराज, गिरगाव मठाचे  शिवाचार्य गुरूपादेश्वर महाराज , हिंगोली विधानसभेचे आमदार तान्हाजीराव मुटकुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच जगन टेकाळे ,साकळे आदि मान्यवरांची उपस्थिती होती.

जुर्वेद स्वाहाकारासाठी वे. मु. प्रसाद पाठक , वे.मु. सचिन पुराणिक वे. मु. कौतुक कुलकर्णी वे.मु. अमीत रेपेकर तसेच चतुर्वेद पारायणासाठी वे. मु. सारंग शार्दुल ऋग्वेद , यजुर्वेद  शुभम उन्हाळे , विजय गोसावी सामवेद, वे. मु. वेदांत जोशी अर्थववेद पारायणासाठी होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी वे.मु. प्रविण जोशी, राजु शुक्ल, बालाजी जोशी,राशु जोशी,अनुगुरु शार्दुल,निरंजन शिरडकर ,महेश धर्माधिकारी,अतुल  दलाल,किशोर ऋषी ,कृष्णा शुक्ल,प्रभाकर  ऋषी,शुभम पाठक सर्वेश शुक्ल, प्रतिक जोशी , अथर्व देशमुख ,तेजस रत्नपारखी,चैतन्य देशपांडे,प्रविण ढवळे,अभय जोशी,सखाराम शार्दुल,विनायक देशपांडे, संजय मेथेकर,नरेश खोडवे, सीमा आलेगावकर (नांदेड),केशव दुबे, प्रल्हाद बासटवार,राजु देशपांडे,सुशील मुंदडा ,दीपा शुक्ला,मीरा शुक्लाकिरण ढवळे ,संध्या पिंपरीकर,सौ. संगिता पिंप्रीकर, विशाखा ऋषी,योगिता जोशी, भाग्यश्री दलाल, प्रज्ञा जोशी, समृद्धी ढवळे ,निलेश जोशीमहेश ढवळे आदींनी परिश्रम घेतले.  यजमान म्हणून डॉ अगस्ती जवळेकर,डॉ अखिल अग्रवाल,ओमप्रकाशजी हेडा, सचिन गुंडेवार, राजेश बियाणी, सुनिल चौधरी, ॲड ए.पी. देशमुख, यांनी सहकार्य केले  सर्वांच्या सहकार्यानेच भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला असे श्री सद्गुरू सेवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाठक यांनी सांगितले आहे .


----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !