बळहेगाव तावैजापूर येथे महिला शेतकरी मेळावा पार पडला.
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर (तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी)
वैजापूर तालुक्यातील बळहेगाव येथे महिला शेतकरी मेळावा पार पडला. सेवासंस्था व कॉटन कनेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात प्रमुख पाहुणे कृषी तज्ञ डॉ. उदय देवळाणकर हे उपस्थित होते.
त्याचप्रमाणे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ चौरस सर, डाॅ.सकिना शेख, वरकड सर, सेवासंस्थेचे पंकज देशमुख, मुंजा भाई, काॅटन कनेक्टचे संदिप माळी, मनिषा मॅडम, परिसरातील सर्व शेतकरी महिला, गावातील साई शेतकरी गट, सावित्री महिला शेतकरी गट, जिजाऊ महिला शेतकरी गट, हिरकणी महिला शेतकरी गट, गावातील सरपंच व उपसरपंच, गावातील प्रगतीशील शेतकरी, सेवासंस्थाच्या महिला व कर्मचारीवर्ग मोठया संख्येने उपस्थित होत्या.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा