maharashtra day, workers day, shivshahi news,

पंढरपूर शहर पत्रकार सुरक्षा समिती शहर अध्यक्षपदी चैतन्य उत्पात तर कार्याध्यक्षपदी लखन साळुंखे यांची निवड

तालुकाध्यक्षपदी अमर कांबळे तर उपाध्यक्षपदी विठ्ठल  जाधव यांची निवड
Pandharpur City Journalist Safety Committee , pandharpur , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समिती शाखा पंढरपूर शहर या शाखेची कार्यकारिणीची बैठक  संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार, नूतन कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे, माजी शहर अध्यक्ष दत्ताजी पाटील, न्यूज १८ लोकमतचे पत्रकार विरेंद्रसिंह  उत्पात, रवींद्र शेवडे जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीसंत दामाजी मठ येथे शुक्रवार दि २९ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वा. संपन्न झाली.

यात पंढरपूर शहर अध्यक्षपदी दैनिक तरुण भारत संवादचे प्रतिनिधी  चैतन्य उत्पात तर कार्याध्यक्षपदी  लखन साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
शहर उपाध्यक्षपदी विश्वास पाटील, सचिव दिनेश खंडेलवाल, सहसचिव महेश कदम, खजिनदार रामकृष्ण बिडकर,सहखजिनदार राजाभाऊ काळे, शहर समन्वयक कबीर देवकुळे, प्रसिध्दी प्रमुख बाहुबली जैन , शहर संपर्क प्रमुख मिलिंद यादव  यांची निवड करण्यात आली.
तर सुरक्षा समिती तालुकाध्यक्षपदी अमर कांबळे यांची व तालुका उपाध्यक्षपदी विठ्ठल जाधव यांची निवड करण्यात आली.
कार्याध्यक्ष पदी खानसाब  मुलाणी, सचिव विकास सरवळे, सहसचिव प्रवीण शहा, खजिनदार प्रदीप आसबे, सहखजिनदार विजयकुमार मोटे, प्रसिध्दी प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे, तालुका संपर्क प्रमुख संतोष चंदनशिवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ राजेश फडे, अमोल गुरव,  यशवंत कुंभार,  नागेश  काळे, संतोष चंदनशिवे,  प्रा.अशोक डोळ सर, सचिन माने, राहुल रणदिवे सोलापूर येथील अक्षय बबलाद, प्रकाश इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रवींद्र शेवडे यांनी केले.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !