काल्याचे किर्तन व दहीहंडी प्रसादाने होणार कार्यक्रमाची सांगता
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
मांजरम ता नायगाव येथे दरवर्षी प्रमाणे दत्त मंदिर येथे दत्त जयंती सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम पार पडत असून दि.२५ डिसेंबर रोजी महापूजा,२६ रोजी गुरुचरित्र पोथी सांगता व दत्तजयंती उस्थवा निमित्त कीर्तन ,रात्री भजन संध्या व २७ रोजी काल्याच्या किर्तनाने दहीहंडी प्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
मांजरम येथे दत्त जयंती सोहळा उस्थहात साजरा केला जातो आहे.सात दिवस गुरुचरित्र पारायण वे.शा.सं.रमेश गुरू राहेरकर यांच्या अमृत वाणी तुन गुरुचरित्र पोथीचे पारायण दररोज होत आहे.रात्री दत्तपंचपदी ,व भजन होत आहे.या पारायनाची सांगता दत्तजयंती दिनी २६ डिसेंबर रोजी होणार आहे.दि.२५ डिसेंबर रोजी श्री १०८ महंत यदुबन महाराज गुरू गँभिर बन महाराज दत्त संस्थान मठ कोलंबी यांच्या शुभ हस्ते महापूजा व एकनामी भजनी मंडळ यांचे भजन होणार आहे.
दि.२६ रोजी गुरुचरित्र पारायण सांगता त्या.नंतर सकाळी १० ते १२ ह.भ.प.परमानंद महाराज दापकेकर यांचे दत्त जन्माचे कीर्तन होणार आहे.रात्री पौर्णिमा निमित्त ऐक्या चा भजनाचा कार्यक्रम ,दि.२७ रोजी सकाळी गुरुचरित्र पोथी व दत्तप्रतिमा यांची पालखी मिरवणुक मुख्य रस्त्यावरून निघेल त्या नंतर ह.भ.प.त्र्यंबक महाराज स्वामी नांदगावकर यांचे काल्याचे कीर्तन या नंतर दहीहंडी महाप्रसादाने कार्यक्रमाँची सांगता होणार आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा