रेती घाटामधील भ्रष्टाचार आमरण उपोषणाकडे अधिकार्यांचे दुर्लक्ष..
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी आरिफ शेख /सिंदखेडाजा
सिंदखेडराजा तालुक्यातील निमगांव वायाळ येथे शासनाच्या आदेशाने रेती घाट सुरू करण्यात आला असून या रेती घाटातून शासनाचे सर्व नियम अटी व शर्ती पायदळी तुडवून केवळ ठेकेदाराचे हितसाध्य करण्यसाठी महसूल विभागाच्या कर्मचार्यांसोबत संगणमत करूण शासनाचे लाखो रूपायाचे महसूल बुडविण्याचे काम सुरू असल्याने सदर ठेकेदारावर कारवाई करून रेती घाटातील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी देवानंद मुरलीधर सपकाळ हे 22 डिसेबर पासुन तहसिल कार्यालया समोर उपोषणास बसले असून या उपोषणाकडे महसूल अधिकारी दूर्लक्ष करीत असल्याचा आरोप उपोषण कर्त्यानी बोलताना केला.
उपोषण करते सपकाळ यांनी बोलताना सांगितले दोन दिवसात महसूल कर्मचारी यांनी उपोषण ठिकाणी भेट दिली नसून अद्याप वैद्यकीय सेवेतील डॉक्टर हे पण माझ्या तब्येत पाहण्यासाठी आले नाही सदर ठेकेदार यांनी निमगाव वायाळ रेतीघाटातुन अंदाधुंद रेती उपशामुळे गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ चालून येणार असल्याने या प्रकरणी सर्वस्वी महसूल विभाग जबादार राहील तसेच सदर येथे घाटावर वाद होउन कायदा व तू व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला तहसीलदार जबाबदार राहील तसेच सदर रेती घाटावर रेती भरण्यासाठी पोकल्यांडचा वापर न करता मजुरांचा वापर करावा या घाटातील प्रत्येक क्षणाला सीसीटीव्ही कायमस्वरूपी सुरू ठेवून त्याचा अहवाल तक्रार दारात देण्यात यावा या मागणीसाठी देवानंद सपकाळ यांनी उपोषण सुरू केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा