पथनाट्यातून केली एड्सबाबत जनजागृती
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
१ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून सर्वत्र संबोधला जातो. याचेच औचित्य साधून कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग शेळवे, पंढरपूर महाविद्यालयातील जी.एन.एम प्रथम वर्ष विद्यार्थ्यांनी आरोग्य उपकेंद्र भाळवणी व महाविद्यालयातील परिसरा मध्ये पथनाट्यातून एड्सबाबत जनजागृती केली. एड्स बाबत समाजामध्ये असणारे गैरसमज , एड्स होऊ नयेत यासाठी घ्यावयाची काळजी तसेच एड्स झाल्यानंतर घेवयचे उपचार व दक्षता याबाबत आपल्या पथनाट्यातून लोकांमध्ये जनजागृती केल्यामुळे एड्स बाबत असलेल्या शंका व गैरसमज दूर होण्यास नक्कीच उपयोग होईल' असे मनोगत आरोग्य उपकेंद्र भाळवणी च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती चिट्टे यांनी व्यक्त केले.
त्यांच्यासोबत आरोग्यसेवक अंकुश मस्के, अधिपरिचारिका ममता ऐवळे आदी उपस्थित होत्या. सदर चा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन रोहन परिचारक, प्राचार्य डॉ. अजित कणसे, रजिस्ट्रार गणेश वाळके यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कीर्ती गंडाळे, नितीन कांबळे, ओंकार बागल हनुमंत अटक, हनुमंत डोंगरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा