पीडित मुलांच्या घरी जाऊन झालेल्या घटनेचा निषेध
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
श्री परमपूज्य योगी श्याम भारती महाराज व भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते धरमसिंग दादा यांनी आज आपारापेठ शिवणि येथे जे शेखर रामलू रायपली या गौरक्षकावर हल्ला झाला आज त्यांच्या घरी जाऊन सांगवी या गावांमध्ये त्यांच्या घरी भेट दिली.
गोरक्षकावर हल्ला होऊन त्यांचा मृत्यू झाला ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे अशा आपल्या भावना व्यक्त करीत योगी महाराज यांनी शेखर रामलू राय पल्ली त्यांचे वडील व त्यांचे छोटे भाऊ एक तर दुर्दैव असं आहे की त्या गौरक्षकाला आई नाही आहे या रायपल्ली यांच्या परिवारावर वर जे दुःखाचा डोंगर कोसळलं तर त्या प्रसंगी श्री परमपूज्य योगी शाम भारती महाराज असे म्हणाले की मी तुमच्या मुलाचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही.
तुम्ही मात्र त्याची तीळभर काळजी करू नका असा सदर कुटुंबांना धीर दिलेला आहे, गोरक्षक यांचे घरातील सर्व सदस्यांनी महाराजांचे कौतुक केले आणि गौरक्षकाचे वडील रामलू रायपल्ली असे म्हणाले आजची पहिली भेट आपण दिली बापू त्यामुळे खरोखर आम्हाला समाधान झालं आणि याच्या पुढे पण असंच सहकार्य राहू द्या म्हणून त्यांचे मन गहिवरले होते.
पीडित मुलांच्या घरी जाऊन झालेल्या घटनेचा निषेध करीत कुटुंबांना धीर दिल्यामुळे श्री परमपूज्य योगी शाम महाराज यांनी भेट दिल्याने पीडित घरच्या सदस्यांनी भावनिक होऊन आभार मानले आहेत.----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा