maharashtra day, workers day, shivshahi news,

मंगळवेढा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील त्यांच्या बदलीनिमित्त पोलीस कर्मचाऱ्यांनी गुलाबाच्या पाकळ्याची उधळण करीत निरोप दिला.

 राजश्री पाटील यांची पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागात बदली 

Rajshree Patil transferred to Investigation Department , mangalweda , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा, प्रतिनिधी मंगळवेढा

मंगळवेढ्याच्या पोलीस दलात वरिष्ठ अधिकाऱ्याप्रती अशी घटना पहिल्यांदाच घडली.राजश्री पाटील यांची पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली त्याबद्दल मंगळवेढा येथील उपविभागीय कार्यालयाच्या वतीने निरोप तर नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांचा स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसाहेब पिंगळे पोलीस उपनिरीक्षक सौरभ शेटे,उपविभागीय कार्यालयाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील म्हणाल्या की पोलीस दलात भरती झाल्यानंतर पहिल्यांदाच मंगळवेढ्याचा पदभार मिळाला.कामाचा फारसा अनुभव नव्हता, मंगळवेढ्यात कामास सुरूवात करताना सुरुवातीला काझी प्रकरण, रस्ते भरपाई व इतर गुन्ह्याचे प्रमाण जास्त होते.

मात्र या पदभार घेतल्यानंतर स्वतःची एक प्रतिमा निर्माण करावयाची संधी मिळाली. शिवाय मंगळवेढ्याची प्रतिमा बदलायची होती म्हणून काम करताना कार्यालयातील पोलीस कर्मचाऱ्यांनी मनुष्य बळ कमी असताना देखील कर्मचाऱ्यांनी काम केले,अवैध धंद्यावर सातत्याने केलेल्या कारवाईमुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली,इथल्या कार्यालयाच्या इमारतीची परिस्थिती व वाढलेले गुन्हे पाहता मोठी भीती मनामध्ये होती.


दरम्यान पदभार घेतल्यानंतर काही दिवसातच तालुक्यातील अवैद्य धंद्याबद्दल विधिमंडळाच्या अधिवेशनातील झालेल्या तारांकित प्रश्नाचे उत्तर पोलीसांनी केलेल्या कारवाईमुळे देता आले.तालुक्यातील वाढलेला गुन्ह्याचा दर कमी झाला. सांगोला व मंगळवेढा कार्यालयाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वाळू कारवाई, दारू धंद्यासह व अन्य अवैध धंदयावर केलेल्या कारवाईमुळे पोलिसांची प्रतिमा उंचावली गेली,कोल्हापूर परिक्षेत्र कार्यालयाची तपासणीत अधिकाऱ्यानी समाधान व्यक्त केले.मंगळवेढा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील त्यांच्या बदलीनिमित्त पोलीस कर्मचाऱ्यांनी गुलाबाच्या पाकळ्याची उधळण करीत निरोप दिला.


राजश्री पाटील यांची पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागात बदली 
 पोलिसांची प्रतिमा उंचावली गेली,कोल्हापूर परिक्षेत्र कार्यालयाची तपासणीत अधिकाऱ्यानी समाधान व्यक्त केले.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !