राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती व मिरवणुकीचे आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी सुदाम दरेकर पारनेर
राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती व मिरवणुकीचे आयोजन पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द येथे "राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, पळवे खुर्द" यांनी आयोजित केले होते. अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस चे पूजन व पुष्पहार घालून तसेच त्यांच्या महान कार्यावर प्रकाश टाकून मिरवणुकी सुरुवात झाली. "जय अहिल्या, जय मल्हार" या गर्जनेने संपूर्ण परिसर दुमदुमला. मिरवणुकीसाठी शिरूर येथील प्रसिद्ध एकलव्य ढोल ताशा पथकाचे आयोजन केले होते. ढोल ताशा आणि घंटा नादाच्या आवाजाने संपूर्ण परिसर दुमदुमला याचा आनंद समस्त ग्रामस्थांनी घेतला.
मिरवणुकीसाठी पळवे खुर्द येथील समस्त धनगर समाज उपस्थित होता तसेच सैनिक बँक संचालक संजय तरटे, माजी. सरपंच संजय नवले सर, तात्याभाऊ देशमुख, माजी. सरपंच नानाभाऊ गाडीलकर, वसंत देशमुख, गुजाबापू पाचरणे, रामदास पाचारणे, रामदास इरकर, गणेश बारगळ तसेच समस्त ग्रामस्थ पळवे खुर्द उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी गणेश इरकर आणि सुनील पाचरणे मेजर यांनी समस्त धनगर समाज आणि आयोजकांचे आभार मानले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा