भालूराव , तपघाले यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी,विविध संघटनेची मागणी
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
महाराष्ट्रामध्ये सातत्याने विविध कारणावरून जातीय भावनेतून दलित समाजावर प्रचंड मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत आणि जात धन दांडगे यांना अभय देत आहेत बोंढार या गावातील अक्षय भालेराव व रेणापूर शहरातील राजे नगर येथील रहिवासी गिरीधर केशव तपघाले यांना ठार मारण्यात आले असून सदर आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी विविध संघटनेच्या वतीने गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार यांच्यामार्फत देण्यात आले आहे.
विचारधिन असलेल्या लोकांकडून पूर्वीपासूनच हल्ले होत आहेत ही पुरोगामी महाराष्ट्राला काळिंबा फासणारी घटना असून बोंढार येथील अक्षय भालेराव यांनी भीम जयंती का काढली म्हणून त्यांचा मनात राग धरून त्याची निर्गुणपणे हत्या करण्यात आली तर रेनापुर शहरातील राजेनगर मधील रहिवासी असलेला गिरीधर केशव तपघाले यांना केवळ तीन हजार रुपयांच्या व्याजे पोटी लोखंडी राड व काठ्याने बेदम मारहाण करून जिवंत मारले आहे .
त्या सदर आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा असल्याचे निवेदन महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना तहसीलदार गजानन शिंदे यांच्यामार्फत लसाकम, लहुजी साळवे प्रतिष्ठान, फकीरा ब्रिगेड व समाज बांधवांच्या वतीने देण्यात आले आहे यावेळी निवेदनकर्त्य प्रा.डां. शंकर गड्डमवार, रा.णा. मेटकर, निष्ठावंत कार्यकर्ते गणपत रेड्डी, माधवराव सोंजे, भीमराव दत्ता बैलके, बाबुराव गजभारे, एन सी झुंजारे, रामचंद्र रोडे,प्रा.बालाजी गायकवाड, चंद्रकांत ढवळे, माधव घंटेवाड, भिवा तोगरे यासह अधिक कार्यकर्त्यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा