खुन्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी .
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथे अक्षय भालेराव यांचा निर्घृण खून करण्यात आला या निषेधार्थ शंकरनगर ता.बिलोली येथे फुले शाहू आंबेडकर क्रांती मंचच्या वतीने 5 जुन रोजी तीव्र निदर्शने करण्यात आली.
गेल्या 50 ते 60 वर्षापासून गावामध्ये भीम जयंती साजरी होत नव्हती. परंतु अक्षय भालेराव यांनी यावर्षी जिल्हाधिकारी यांच्याकडून रीतसर परवानगी काढून भीम जयंती साजरी केली तोच राग मनात धरून अक्षय भालेराव यांची जातीय वाद्याकडून हत्या करण्यात आली.
अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयांना पन्नास लाख रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान देण्यात यावे. कुटुंबातील एका व्याक्तीस शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे. खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे. खुन्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी . अशा आशयाच्या मागण्या करण्यात आल्या.
यावेळी फुले शाहू आंबेडकर, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे क्रांती मंच संस्थापक अध्यक्ष भास्कर भेदेकर, सुनील कांबळे, नागसेन जिगळेकर ,प्रमोद फकिरे ,निळकंठ तरटे ,जयदीप कांबळे, दयानंद कांबळे , प्रकाश हो नसांगळे, इंद्रजीत डुमणे श्याम गायकवाड, संदीप उमरे, विकास कांबळे, प्रवीण फकीरे, ब्रम्हा कांबळे, मुनेश्वर सोनकांबळे, अंकुश वाघमारे, चांदु सोनकांबळे , बाबू भेदेकर, राहुल भेदेकर, साहेबराव बक्कावाड कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्रात दिवसेंदिवस विविध ठिकाणी दलित समाजावर एवढ्या क्रूरपणे घटना घडतात पण कुठलीच कारवाई होत नाही विविध सामाजिक संघटनेचे आंदोलन मोर्चे निषेध होत असताना सरकार बघ्याची भूमिका घेऊ नये, आंदोलन यापुढे तीव्र करण्यात येणार आहे असाही इशारा सदर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा