आंतरराज्यातील महिला आरोपींचा पोलिसांनी पर्दाफाश केला.
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी संजय क्षीरसागर
अकोला- पातूर महामार्गावरील म्हैसपुर इथे ५ मे पासून 'पंडित प्रदीप मिश्रा' यांच्या शिवमहापुराण कथेला प्रारंभ झाला. येत्या ११ मे पर्यंत ही कथा चालणार आहे. या कथेत महिलांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेत अनेक महिला चोरट्यांनी या कथेला आपलं लक्ष करीत इथे आलेल्या भाविकांचे मंगळसूत्र व इतर मौल्यवान वस्तू चोरी केल्या. गेल्या दोन दिवसात या कथेत चोरीच्या पंधराहून अधिक घटना घडल्या अकोल्यात सुरू असलेल्या 'श्री शिव महापुराण कथा' कार्यक्रमात आलेल्या महिला भक्तांची सोनसाखळी चोरी करणारी टोळी पोलिसांनी गजाआड केलीये.
ही टोळी आंतरराज्यातील असून यामध्ये महिला आरोपींचा पर्दाफाश करून पोलिसांनी १० महिलांना अटक केलीये.या चोरीच्या गुह्याचा तपास अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं हाती घेतला. अशाच काही चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी अकोला पोलीस भाविकांसोबत फिरले. त्यात काही जणांना पकडण्यात पोलिसांना यश आलं. तब्बल दहा महिला चोरट्यांना अटक करण्यात आली असून या सर्व महिला बाहेर जिल्ह्यातील तसेच अंतरराज्यातील असल्याचं समजते. पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याचे दागिने देखील जप्त केले आहेत.
आशा हरीलाल धोबी (रा. रेल्वे स्टेशन जवळ नागपुर), मुंज्जु देवी राजु धोबीरा (रा. रेल्वे स्टेशन जवळ नागपुर), चंदा सोनु धोबी (रा. रेल्वे स्टेशन जवळ नागपुर), अनिता सुरेश धोबी (रा रेल्वे स्टेशन जवळ नागपुर), कमलेश सुरजलाल बावरीया (रा. रंतीत नगर भरतपुर राज्य राजस्थान), शशी रीकु बावरीया (रा. रंतित नगर भरतपुर राज्य राजस्थान), कश्मीरा हीरालाल बावरी (रा. रंतित नगर भरतपुर राज्य राजस्थान), प्रीया संदीप उन्हाळे (रा सावंगी मेघे जि वर्धा), सुरया राप्रसाद लोंडे (रा सावंगी मेघे जि वर्धा), लता किशन सापते (रा. भीमनगर इदोर राज्य मध्यप्रदेश) अशी आरोपी महिलांची नावे आहेत. महिला पोलीस अमलदारांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ३ मिनी डोरले व जोड, दोन मिनी मंगळसुत्र वजन ३२ ग्रॅम, ज्याची किंमत १ लाख ८२ हजार इतकी आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा