maharashtra day, workers day, shivshahi news,

कुंटूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 94 टक्के मतदान उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद

उद्या मतमोजणीत, होणार नव्या कारभाऱ्यांचा फैसला

Agricultural Produce Market Committee election, kuntur, naigaon, nanded, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर) 

नायगाव तालुक्यातील कुंटूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जोरदार निवडणुकीचे वारे जोरदार सुरू होते. आज 28 तारखेला मतदान झाले असून काही बूथवर बोगसही मतदान करण्यात आल्यामुळे एक तासापासून वादविवाद चालू होता पोलीस प्रशासनाने मध्येच ती करून सर्ववाद मिटवला त्यामुळे बोगस मतदान झाल्याचे स्पष्ट चित्र पाहायला मिळाले राजकारणी मात्र कुरघोडीचे राजकारण  केले असल्याचे स्पष्ट चित्र सध्या तरी दिसले असून उमेदवारांनी पोलीस स्टेशन कडे तक्रार  करणार असल्याचे सांगितले. कुंटूर येथील सेवा सहकारी सोसायटी सर्वसाधारण मध्ये 357 मतदानापैकी 338 मतदान झाले त्यामध्ये 60 महिला असून अन्य पुरुष आहेत.

 आणि पुरुष आहेत ,  ग्रामपंचायत मतदार संघामध्ये 341 मतदार असून 330  मतदान झाले . त्यामध्ये 209 महिला , 121 पुरुष आहेत . व्यापारी मतदारसंघांमध्ये 81 मतदानापैकी  78 मतदान झाले.  सदर अंदाज घेता 94 टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट निवडणूक निर्णय अधिकारी एल चौधरी यांनी सांगितले.  कुंटुर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील मतदान कृषी उत्पन्न बाजार समिती सोसायटीच्या 17 उमेदवारांना निवडून देण्यासाठी चांगल्या प्रकारे 94 टक्के मतदान झाले . मात्र काही गोंधळ वगळता बाकी शांततेत मतदान पार पडले मतदान कुंटुर येथील महिला सुजलेगाव  येथील महिलांच्या नावाने मतदान टाकताना उमेदवार व पोलीसांनी पकडले होते .  एक महिला दुसऱ्याच नावाने मतदान केल्याने पोलिसांनी वेळीच पकडून तिला हाकलून दिल्याने वाद मिटला ,   कडेकोट पोलिस बंदोबस्तात मत पेट्या  सिल करून  बंद करून योग्य ठिकाणी ठेवण्यात आले.

उद्या दहा वाजता मतमोजणी कुंटुर येथील बुथवरच  होणार व  निकालही जाहीर होणार असल्याची माहिती चौधरी यांनी दिली आहे.
 ----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !