धर्माबाद येथील पत्रकार संघटनेची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
धर्माबाद शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नगरपालिकेच्या बाजूसच जुने न्यायाधीश भवनाची जागा पत्रकार भवनासाठी आरक्षित करावी अशी वास्तववादी मागणी पत्रकारांच्या वतीने बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गंगाधर धडेकर यांच्यासह अनेक पत्रकार यांनी धर्माबाद नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सौ. नीलम कांबळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केल्यामुळे पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडीया ऊन, पाऊस,वारा यांची तमा न करता कठीण परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करणाऱ्या पत्रकारांना निवारणासाठी पत्रकार भवनाची नितांत गरज आहे.धर्माबाद तालुक्यात पत्रकारांच्या विविध संघटना असून पैकी बहुभाषिक पत्रकार संघ, मराठी पत्रकार संघ, धर्माबाद पत्रकार संघ, युवा पत्रकार संघ, संपादक व पत्रकार संघ अशा 5 पत्रकार संघटना असून पेक्षा 100 अधिक वर्तमानपत्राचे प्रतिनिधी काम करतात. वृत्त संकलन करून बातम्या लिहिण्यासाठी त्यांना घरी जावे लागते किंवा दुसऱ्या ठिकाणी बसून वृत्तांत लिहावे लागते. अशा धावपळीत त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न उद्भवतो.
अशावेळी पत्रकार भवन हे सर्व पत्रकारांसाठी आशेचा किरण आहे. जिथे शहरासह तालुक्यातील सर्व पत्रकार आराम करू शकतात. विचार विनिमय करू शकतात, सर्वसामान्यांच्या विकासासाठी वास्तववादी भूमिका ठरवू शकतात. पण आज घडीला पत्रकारभावनासाठी कुठलीही राजकीय व्यक्ती पुढाकार घेत नाहीत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नगरपालिका कार्यालयाच्या शेजारीच असलेल्या जुने न्यायाधीश भवन (जेज क्वार्टर) हे पत्रकार भावनासाठी आरक्षित करा अशी वास्तववादी मागणी बहुभाषिक पत्रकार संघटनेच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांना केली आहे. ही मागणी तात्काळ मान्य व्हावी यासाठी मुख्याधिकारी ,प्रशासनाचे प्रतिनिधी तथा प्रशासक उपजिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा अशा सर्व पत्रकारांच्या भावना आहेत. तत्कालीन नगराध्यक्ष विश्वनाथराव पाटील बन्नाळीकर आणि विनायकराव देशमुख यांना पत्रकार भवनासाठी जेष्ठ पत्रकार संजय कदम यांनी दहा वर्षांपूर्वी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा