नांदेड. जि.म.स. बँक चे अध्यक्ष वसंतरावजी पाटील चव्हाण यांच्या हस्ते सत्कार
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील रातोळी येथील सेवा सहकारी सोसायटी सन 2023.या कालावधीतील निवडणुकीत बिनविरोध निवड करण्यात आली, गावाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी रातोळी येथील सेवा सहकारी सोसायटी च्या बिनविरोध निवड झालेल्या सर्व संचालक मंडळाचे नायगाव, उमरी, धर्माबाद, मतदारसंघाचे माजी आमदार तथा नांदेड जिल्ह्य मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतरावजी पाटील चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रातोळी येथील सेवा सहकारी सोसायटी येथील बिनविरोध निवड झालेले सदस्य सर्व साधारण प्रवर्गातील पुरूष गटातील उमेदवार पाटील अंकुश चंद्रभान,पाटील शिवाजी विश्वांभर,पाटील सोमनाथ दिगंबरराव,पत्रकार पाटील गजानन नीवृती, दिगांबर, मोरे शंकर गोविंद, टाकळे व्यंकटी माणिका, पाटील दिलीप विश्वांभर, पाटील विनायक आत्माराम, अनुसूचित प्रवर्गातील पुरूष उमेदवार सोनकांबळे यशवंत कोंडीबा विजा / भ.ज.वि.जा / ज किंवा वि.मा.प्र. प्रवर्गातील गटातील पुरूष उमेदवार पाटील बालाजी मारोती, सर्व साधारण प्रवर्ग गटातील महिला उमेदवार पाटील माधुरी संदिप, लुंगारे गंगाबाई धोंडिबा, यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
या बिनविरोध निवड झालेल्या नवनिर्वाचित उमेदवारांचे दि.20 मार्च 2023 रोजी नायगांव, उमरी, धर्माबाद, मतदार संघाचे माजी आमदार तथा नांदेड जिल्ह्य मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतरावजी पाटील चव्हाण यांच्या हस्ते नायगाव येथील कार्यालयात सत्कार करून यांचे अभिनंदन करण्यात आले,व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मार्केट कमिटी नायगाव चे अध्यक्ष श्री श्रीनिवास पाटील चव्हाण, नायगाव, उमरी, धर्माबाद, मतदारसंघाचे नेते मा.प्रा.रविंद्र पाटील चव्हाण, सुर्याजी पाटील रातोळीकर, व तसेच रातोळी गावातील नागरिक व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित संचालक मंडळाचे सत्कार करण्यात आला.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा