maharashtra day, workers day, shivshahi news,

ससून रुग्णालयाच्या समाजसेवा अधिक्षक विभाग प्रमुखपदी डॉ. शंकर मुगावे यांची नियुक्ती - Sassoon Hospital Superintendent of Social Services Head

महाराष्ट्र राज्य समाजसेवा अधिक्षक संघटनेचे आहेत राज्य उपाध्यक्ष
Sassoon Hospital Superintendent of Social Services Head, Dr. Shankar Mugave, pune, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पुणे (प्रतिनीधी अभिषेक जाधव)
रक्तदानाच्या क्षेत्रामध्ये डॉक्टर मुगावे यांचे आहे भरीव कार्य
ससून सर्वोपचार रूग्णालय पुणे येथील समाजसेवा अधिक्षक विभागाचे विभागप्रमुख म्हणून डॉ. शंकर मुगावे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. मुगावे यांनी सलग १८ वर्षे ससून रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये समाजसेवा अधिक्षक या पदांवर सेवा केली आहे.  बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, ससून रुग्णालय व पुणे महानगरपालिका अंतर्गत नागरी आरोग्य शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र पुणे येथे समाजसेवा अधिक्षक पदाची जबाबदारी त्यांनी सहा वर्षे पाहिली.  कोरोना संकटकाळात डॉ.मुगावे यांनी  पश्चिम महाराष्ट्रातील  विभागीय स्तरावरील रक्तपेढीत मुख्य समन्वयक म्हणून तीन वर्षे यशस्वीपणे कार्य केले.  
डॉ. शंकर मुगावे यांनी रक्तदान क्षेत्रात विशेष कार्य केले आहे. त्यांनी आजपर्यत ९९ वेळा ऐच्छिक रक्तदान केले असून  साडे तीन लाख रक्तदात्यांचे ऐच्छिक रक्त संकलन केले आहे. रक्तपेढींच्या समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधनात्मक अभ्यास करून त्यांनी या विषयावर पीए.डी.पदवी संपादन केली. ते महाराष्ट्र राज्य समाजसेवा अधिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आहेत.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !