हदगाव तालुका अध्यक्षपदी मारुती रामकिशन काकडे तळेगावकर तर उपाध्यक्षपदी गजानन जिदेवार आष्टीकर
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर)
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात आज दि. १९/०१/२०२३ रोजी मानवाडी येथील मारुती मंदिराच्या सभागृहात मराठा क्रांती दल महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष राजीव भांगे पाटील व गजानन घाटफोडे पाटील प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशाने मराठवाडा विभागीय अध्यक्ष गजानन सुधाकरराव पतंगे यांच्या उपस्थितीत हदगाव तालुक्याची कार्यकारणी जाहीर झाली त्या कार्यकारणी मध्ये हदगाव तालुका अध्यक्ष म्हणून मारुती रामकिशन काकडे तळेगावकर. यांची तर उपाध्यक्षपदी गजानन जिदेवार आष्टीकर.
तसेच तालुका महासचिव म्हणून तुषार देवराव कांबळे कवाना. तर सोशल मीडिया तालुका अध्यक्षपदी महेंद्र धोंगडे यांची निवड करण्यात आली तर तालुका संघटक म्हणून लक्ष्मण पुंडलिकराव ढगे तळ्याची वाडी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी संघटनेचे विभागीय मराठवाडा अध्यक्ष गजानन सुधाकरराव पतंगे साहेब यांनी यावेळी सर्वांना नियुक्तीपत्र देऊन सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित सुनील भाऊ बराटे तसेच काही मराठा बांधव व , पत्रकार महेंद्र धोंगडे राष्ट्रदीप वाढवे उपस्थित होते.
मराठा क्रांती दल संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष हदगाव दौऱ्यावर आले असताना रिपब्लिकन सेना हादगाव तालुका अध्यक्ष यांच्यावतीने त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला रिपब्लिकन सेनेच्या वतीने १३/१/2023 रोजी केदारगुडा येथील आदिवासी आश्रम शाळेत 12 डिसेंबर रोजी विश्रांती बाळू देशमुखे या मुलीने आत्महत्या केली होती या प्रकरणाचा तपास सी-आय-डी मार्फत चौकशी करण्यात यावी पीडित मुलीच्या आई वडिलांना दाहा लाख रुपयांची तात्काळ मदत करण्यात यावी यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर हदगाव येथे १३/१/२०२३ रोजी रिपब्लिकन सेनेच्या हदगाव वतीने उपोषण करण्यात आले होते त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठा क्रांती दल मराठवाडा विभागीय अध्यक्ष गजानन सुधाकरराव पतंगे व संघटनेच्या वतीने उपोषणाला तहसीलदार साहेब यांना एक निवेदन देऊन जाहीर पाठिंबा दर्शवला होता आणि आज गजानन सुधाकरराव पतंगे पाटील हदगाव येथे आले असता रिपब्लिकन सेनेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला त्यावेळेस तालुका अध्यक्ष सुनील भाऊ बराटे तालुका महासचिव राष्ट्रदीप वाढवे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा