maharashtra day, workers day, shivshahi news,

राज्यात हुकुमशाही सुरू, अभिव्यक्ती स्वातंत्र्य चिरडले जातेय. - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप

पंढरपूरात निलंबित पोलिस व पत्रकार गोविंद वाकडेंच्या समर्थनार्थ मुकमोर्चा करत अनोखे आंदोलन

chandrkant patil, innk attack, swabhimani shetkari sanghatana, pandharpur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे, सोबतच चंद्रकांत पाटील यांच्या संरक्षणात असलेल्या दहा पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे, व या प्रकरणाची शूटींग केली म्हणूनच न्युज 18 लोकमतचे पत्रकार गोविंद वाकडे यांचीही चौकशी करण्यात आली आहे.. आता याच बाबत पंढरपूरात सर्वपक्षीय प्रतिनिधींनी तेथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एकत्र येत तोंडावर काळ्या फिती बांधुन सरकारचा निषेध करण्यात आला

यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा राज्य प्रवक्ते रणजित बागल म्हणाले की, राज्यात अघोषित आणीबाणी सुरू आहे, एकिकडे महापुरूषांबाबत अवमानकारक विधाने करायची नंतर त्याबाबत शाईफेक झाली की पोलिस बांधवांवर कारवाई करायची हा कुठला न्याय. ही हुकुमशाहीकडे वाटचाल आहे. सोबतचं शूटींग केलेल्या न्युज 18 लोकमतचे पत्रकार गोविंद वाकडे यांची देखील चौकशी करण्यात आली आहे.. आता पत्रकार बांधवांनी समोर घडलेल्या घटनेची बातमी सुध्दा करण्यावर एक प्रकारे पायबंदच लावल्याप्रमाणे आहे. या सर्व घटनेच्या निषेधार्थ आम्ही शांततेच्या मार्गाने आज हे आंदोलन करत असुन या लोकशाही विरोधी सरकारच्या विरोधात आमचा लढा सुरूच राहील. असे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, वंचितचे सागर गायकवाड,राष्ट्रवादीचे उमेश सासवडकर,शिवसेना ठाकरे गटाचे तानाजी मोरे,स्वप्निल गावडे,राष्ट्रवादीचे संतोष बंडगर,दादा थिटे,निलेश कोरके यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !