विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत गहिनीनाथ महाराज औसेकरांनी व्यक्त केली नाराजी
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा भाविकांच्या दर्शना रांगेसाठी असलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडप पाडण्याबाबतचा प्रस्ताव तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात आहे. याबाबत मंदिर समितीला विश्वासात घेतले नसून मंदिरा संदर्भात विकास कामे करताना समितीला विश्वासात घ्यावे. असे मत समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी व्यक्त केले.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीनंतर औसेकर महाराज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय जाधव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्य संभाजी शिंदे, अॅड. माधवी निगडे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
ह.भ.प. औसेकर महाराज यांनी कार्तिकी यात्रेच्या शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण पाठवणे, मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना जादा कामाचा भत्ता, दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान, बक्षीस, दिवाळी अग्रीम देणे, भक्तनिवास येथे निवासासाठी आलेल्या यात्रेकरूंसाठी ई- बस सुविधा उपलब्ध करून देणे, विविध सण, यात्रा उत्सवातील विठ्ठलाच्या मिरवणुकीसाठी तसेच पालखी सोहळ्यासाठी दानशूर भाविकांमार्फत रथ उपलब्ध करून घेणे, गो शाळेत विविध विकासात्मक कामे करणे, भाविकांना चप्पल स्टैंड व दर्शन रांगेत फ्री - फॅब्रिकेटेड शौचालय उपलब्ध करून देण्याचे ठरल्याचे सांगितले.
भाविकांच्या अपघात पॉलिसीसाठी दहा लाख साठ हजारांचा खर्चविठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी समितीच्या वतीने काढलेल्या विम्याची मुदत संपली आहे. पंढरपूर नगरपालिका क्षेत्र, ६४ एकर क्षेत्र, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, दर्शन रांग टाकळी, गोपाळपूर, भटुबरे ,शेगाव दुमाला, वाखरी पालखी तळ आदी परिसरांचा समावेश आहे. विमा कंपन्यांना मंदिर समितीकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे आव्हान केले होते; परंतु दोन वेळा फक्त दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने अर्ज केला होता. तिसऱ्यांदा ही त्याचा अर्ज आल्याने विमान पॉलिसी उतरवण्याचे काम त्यांना देण्यात आले आहे. यासाठी दहा लाख 65 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे.
परकीय देणगीसाठी एफसीआरए रजिस्ट्रेशन
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा