त्यांच्या टी-शर्ट वर केली रश्मिकाने स्वाक्षरी
रश्मीका मंदाना ( rasmika mandana )आपल्या सौंदर्यामुळे आणि एक्स्प्रेशन मुळे नॅशनल क्रश ( national crush )बनली आहे. ती जेव्हा जेव्हा तिच्या चाहत्यांसमोर येते मोकळेपणाने त्याच्याशी संवाद साधते. पुष्पाच्या अफाट यशानंतर तर तिच्या चाहत्यांच्या संख्येत खूप मोठी वाढ झाली आहे . तिच्या सोशल मीडियावर करोडो फॉलोअर्स आहेत. रश्मिका देखील आपल्या चाहत्यांच्या फर्माईश पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. आताही तिला एक असाच अनुभव आला आहे. आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
आज लाखो लोकांच्या हृदयावर अभिनेत्री रश्मी का मंदाना ही राज्य करत आहे. अनेकदा सेलिब्रिटींकडे त्यांचे चाहाते ते वेगळी मागणी करताना दिसतात. रश्मिकाला ही असाच अनुभव आला आहे. तिच्या एकाच हत्याने तिच्याकडे एक भलतीच मागणी केली, जी ऐकून रश्मिकाला आश्चर्यच वाटले.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. रश्मी गाणे नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती, तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, रश्मिका ला पाहण्यासाठी तिच्या अवतीभवती चाहत्यांची गर्दी जमली आहे.
त्यातील एक चाहता तिच्या जवळ आला आणि त्याने रश्मिका मंदानाला त्यांनी घातलेल्या टी-शर्ट वर हृदयाच्या जागी स्वाक्षरी देण्यास सांगितले. त्याची ही विचित्र मागणी ऐकून सुरुवातीला रश्मीकाने नकार दिला. पण नंतरच्या त्यांच्या आनंदासाठी तिने त्याच्या छातीवर स्वतःचं नाव लिहिलं.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा