' पुष्पा २ 'च शूट सुरू!
' पुष्पा 'पुष्पराज..... मे झुकेगा नही साला 'असं म्हणत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत कोट्यावधीची कमाई करणाऱ्या पुष्पाच्या पुढील भागाचं चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. यासाठी ऑक्टोंबर चा मुहूर्त काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पुष्पाच्या पहिल्या भागात अल्लू अर्जुन ( allu arjun ) आणि रश्मिका मंदाना (rashmika mandana ) याच्या भूमिका होत्या. चित्रपटाचे कथानक, कलाकारांचे अभिनय, आणि फुल्ल ऍक्शन यामुळे पुष्पा चित्रपटाने भरपूर यश मिळवले होते . बॉक्स ऑफिसवर कमाईचे उच्चांक करणाऱ्या पुष्पाचा दुसरा भाग येत आहे,
त्यामुळे अल्लू अर्जुन लवकरच पुन्हा एकदा पुष्पा रूप धारण करणार आहे. साधारण ऑक्टोंबर च्या मध्यापासून अल्लू ' पुष्पा २ ' च्या चित्रीकरणास सुरुवात करेल आणि लवकरच त्याचा नवा लुक प्रेक्षकांसमोर येणार असल्याची माहिती मिळाली आहे. अल्लू सध्या ' पुष्पा ' साठी प्रचंड मेहनत घेत असून ' पुष्पा २ ' ची तयारी जोरात सुरू आहे. प्रेक्षकांमध्ये पुष्पाची इतकी क्रेझ आहे, की सोशल मीडियावर यातील गाणी, सीन्स आणि मोनोलोक्स ट्रेंड झाले होते. संपूर्ण वातावरण ' पुष्पा 'मय झालं होतं आणि मुलांमध्ये ' सामी सामी ' आणि ' श्री वल्ली ' ही गाणी पॉप्युलर झाली होती.लवकरच पुन्हा एकदा पुष्पा आपले नवे रंग उधळण्यासाठी येणार आहे
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा