हॉटेलवर दारू पिणे बेकायदेशीर असताना सोलापूर हैदराबाद रोडवरील हॉटेल मातोश्री ढाबा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी रात्री उशिरा छापा टाकला. या छाप्यात हॉटेल चालकाला 25 हजार रुपये तर मद्यपींना प्रत्येकी पाचशे रुपये दंड ठोठावीला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली.
28 सप्टेंबर 2022 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोलापूर हैदराबाद रोडवरील हॉटेल मातोश्री येथे धाड टाकली. असता हॉटेल चालक नेताजी लिंबाजी जगताप (रा. दहिटने ) यांच्यासह त्यांच्या हॉटेलमध्ये अवैद्य रित्या दारू पिण्याकरिता बसलेल्या 13 मद्यपींना अटक करून ताब्यात घेतले. अटक आरोपींच्या ताब्यातून तीन हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. निरीक्षक संभाजी फडतरे, सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक अंकुश अवताडे, उषा किरण मिसाळ व सहाय्यक दुय्यम निरीक्षक बिराजदार मुकेश चव्हाण यांच्या पथकाने कारवाई केली. तपास निरीक्षक पुष्पराज देशमुख यांनी पूर्ण केला.
सदर गुन्ह्यांचे तपास अधिकारी यांनी 24 तासात तपास पूर्ण करून गुरुवारी 29 सप्टेंबर रोजी गुन्ह्यांचे आरोप पत्र न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने तत्काळ निकाल देत हॉटेलचालक यास पंचवीस हजार व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी पाचशे रुपया प्रमाणे असा एकूण 31 हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा