सर्वांनीच आवर्जून पहावे असे सावित्री नाटक - सत्यशोधक रघुनाथ ढोक
शिवशाही वृत्तसेवा पुणे
लोकशास्र सावित्री नाटकाचा पुण्यातील पहिला प्रयोग बालगंधर्व रंगमंदिर येथे शुक्रवार दि.29 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 5.30,(वेळेतच सुरू होणार) वाजता होणार आहे
या नाटकाचा हा पुण्यातील 26 शो असून यापूर्वी मुंबई , नाशिक, रायगड, पनवेल अशा अनेक ठिकाणी सर्व शो फुल झाले असून या कलाकार मंडळी चे म्हणणे आहे की फुले दाम्पत्य यांनी पुण्यनगरीतून आपल्या सामाजिक , शैक्षणिक कार्याचा प्रारंभ करून महिलांना ज्ञानाची गंगा प्रथम पाजली म्हणूनच आजच्या महिला सामाजिक, राजकीय,शैक्षणिक वैज्ञानिक क्षेत्रात उतुंग भरारी घेतल्याचे जाणवत आहे. ही पुण्याई सावित्री जोती मिळाली आहे. परंतु आज लोक महापुरुषांचे फहक्त पुतळ्याला हार घालताना दिसतात पण त्यांचे विचार मनात रुजवत नाहीत. खरे तर त्यांचे विचाराने आपण पुढे जाऊन भावी पिढीला आदर्श, विचार देण्याची गरज आहे त्यासाठी आमची रंगभूमी काम करीत आहे.
पुढे समता भूमीवर सायली, अश्विनी, कोमल , म्हसके हे कलाकार मंडळी म्हणाले की आम्ही समतभूमीवरील महात्मा फुले वाड्यात येऊन धन्य झालो असून या ठिकाणीही ऊर्जा घेऊन यापुढे आम्ही अतिशय जोमात काम करून सावित्री चा विचार प्रत्येक माणसाचे मनात रुजवून एक महिला शिकली तर सर्व कुटुंब साक्षर होते त्याप्रमाणेच विचारांचा जागर आम्ही जागृत करणार आहोत.तरी सर्वांनी हे नायक पाहण्यास विसरू नये असे आवाहन सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी केले तर पुढे ढोक असेही म्हणाले की या कलाकार मंडळी चा फुले एज्युकेशन तर्फे योग्य तो सन्मान प्रयोग झालेवर करणार आहे तसेच भारतभर याचे प्रयोग सुकर व्हावेत असे शुभेच्छा देऊन मदत करणार असल्याचे म्हंटले.यावेळी जागृती न्युज चॅनेल चे संपादक विजय भुजबळ उपस्थित होते तर आकाश ढोक यांनी आभार मानले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा