कारखाना साईट व पंढरपूर येथील साखर विक्री केंद्राचे शुभारंभ
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने गुढीपाडवा सणासाठी सभासदांना सवलतीच्या दरात देण्यात येणाऱ्या साखर विक्री केंद्राचे शुभारंभ व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळूंखे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन विष्णु यलमर, सभासद सुरेश काळे, आप्पासो काळे, लक्ष्मण दांडगे,संतोष पवार उपस्थित होते.
सहकार शिरोमणी कारखान्याचे वतीने ऊस उत्पादक सभासद,बिगर सभासद शेतकरी यांना गुढीपाडवा सणासाठी सवलतीच्या दरात प्रत्येकी 30 किलो साखरेचे वाटप कारखाना कार्यस्थळावर व पंढरपूर येथील प्रतिभादेवी नागरी सह.पतसंस्था या दोन ठिकाणी साखर विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे. सदर साखर विक्री सकाळी 10 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत सुरु असून साखरेचे कुपन चिटबॉय मार्फत सभासदांना घरपोच करण्यात आले असून संबंधीत ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी साखर कुपनासह स्वत:चे आधारकार्ड किंवा ओळखपत्र दाखवून साखर घेण्यात यावी कोरोना विषाणुच्या प्रार्दुभावामुळे सर्व सभासद शेतकऱ्यांनी सोशल डीस्टन्सचे पालन करुन साखर घेताना मास्कचा वापर करावा व कारखाना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन कारखान्याचे व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे यांनी केले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा