दोन गाळे सील करण्यात आले एका दिवसात 30 लाखाचा वसूल
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील विविध शॉपिंग सेंटर मधील 200 गाळे धारक यांना भाडे व कराची रक्कम भरणे बाबत चोवीस तासांची नोटीस देऊन गाळे सील करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या सदर नोटीस मिळून सुद्धा संबंधित गाळेधारक यांनी कर व भाड्याची रक्कम न भरल्याने इंद्रप्रस्थ , नवी पेठ व कर्मवीर औदुंबर पाटील शॉपिंग सेंटर मधील थकित गाळेधारक यांचे सील करण्याची धडक मोहीम राबवून कारवाई करण्यात आली गाळे सील करणेची कारवाई झाल्याने एका दिवसामध्ये ३० लाख इतकी कर व भाडे ची वसुली करण्यात आली यावेळी दोन दुकान गाळे सील करण्यात आले. सदर ची कारवाई प्रशासक गजानन गुरव व मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता पर्यवेक्षक श्री बाळू कांबळे, वॉरंट अमलदार संजय माने, चेतन चव्हाण, लिपिक सुरेश पवार, मंगेश परदेशी, स्वप्निल नेहतराव सुनील सोनार, उमेश पानादी आदित्य लोखंडे, संजय पारखे, संभाजी देवकर, मधुकर शिरसागर, पांडुरंग देवमारे फावडे राजेंद्र जपे यांनी केली असल्याची माहिती उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर यांनी दिली तरी शहरातील ५००० गाळेधारक व खाजगी मालमत्ताधारक यांना नगरपरिषदेने जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत तरी सम्बधित गाळेधारक व खाजगी मालमत्ताधारक यांनी कराची व भाड्याची थकीत रक्कम त्वरित भरून नगरपरिषद सहकार्य करावे व आपणावर येणारी जप्तीची कारवाई टाळावी असे आवाहन मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी केले आहे
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा