विद्यालयातील 1ते 15 वयोगटातील विद्यार्थ्यांना मेंदूज्वर लस व 15ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना कोवॅक्सीन लस देण्यात आली
शिवशाही वृत्तसेवा विद्यालय
पंढरपूर येथील श्री सिताराम महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे 900 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. विद्यालयातील 1ते 15 वयोगटातील विद्यार्थ्यांना मेंदूज्वर लस व 15ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना कोवॅक्सीन लस देण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी बिराजदार यांनी विद्यार्थ्यांना लसीकरणविषयी मार्गदर्शन केले.व सर्व विद्यार्थ्यांनी न घाबरता सुरक्षिततेसाठी लस घ्यावी असे आवाहन केले . यावेळी प्रशालेकडून कोरोना योद्धे म्हणून आरोग्य विभागातील कर्मचारी डॉ.बालाजी बिराजदार, आरोग्य निरीक्षक शिवाजी कांबळे, सहाय्यक सुनंदा सुरवसे, आरोग्यसेवक अजित अभंगराव आरोग्यसेविक.राजमाता कोडे, सुनिता शिंदे दिगंबर पवार, गणेश सलगर,सुनिल मुडे, हसिना तांबोळी यांचा शाल,श्रीफळ,गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी चेअरमन मुकुंद परिचारक, प्राचार्य सचिन कुलकर्णी, सरपंच मनिषा सव्वाशे, उपसरपंच शरदभाऊ रोंगे, मा. सरपंच रमेश हाके, चेअरमन संतोष रोंगे पाटील, चेअरमन हनुमंत रोंगे पाटील, मा. चेअरमन उमाकांत रोंगे, ग्रा .पं सदस्य नारायण रोंगे, सिताराम रोंगे, ट्रस्ट अध्यक्ष दीपक रोंगे, भगवान सव्वाशे, पर्यवेक्षक सी .बी. रोंगे, प्रा. महादेव भोसले, प्रा.जे के बनकर, प्रसाद संत, सचिन शिंदे,कांबळे,लिपीक गुलाब मस्के, सेवक रमेश जाधव, दत्ता माळी, शिवाजी येडगे, नवले, शिंदे, यांच्यासह शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी विद्यार्थिनी ,पालक उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा